WPL Auction : एकूण किती खेळाडूंची खरेदी? किती खर्च झाला? कोणावर सर्वाधिक बोली? जाणून घ्या 10 पॉइंट्समध्ये

WPL Auction : पाच फ्रेंचायजींसह महिला प्रीमियर लीगची सुरुवात होत आहे. पहिल्याच ऑक्शनमध्ये काही रेकॉडर्स बनले. काही चक्रावून टाकणाऱ्या गोष्टी सुद्धा घडल्या. अनेक खेळाडूंसाठी नशिबाचे दरवाजे उघडलेत.

WPL Auction : एकूण किती खेळाडूंची खरेदी? किती खर्च झाला? कोणावर सर्वाधिक बोली? जाणून घ्या 10 पॉइंट्समध्ये
WPLImage Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 8:15 AM

WPL Auction 2023 : IPL नंतर WPL ने इतिहास रचलाय. महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने आयपीएलसारखी टुर्नामेंट सुरु केलीय. महिला प्रीमियर लीगसाठी सोमवारी 13 फेब्रुवारीला लिलाव झाला. या लिलाव प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात खेळाडूंना विकत घेण्यात आलं. पाच फ्रेंचायजींसह महिला प्रीमियर लीगची सुरुवात होत आहे. पहिल्याच ऑक्शनमध्ये काही रेकॉडर्स बनले. काही चक्रावून टाकणाऱ्या गोष्टी सुद्धा घडल्या. अनेक खेळाडूंसाठी नशिबाचे दरवाजे उघडलेत. काही महिला खेळाडू कोट्याधीश बनल्या.

मुंबई लिलाव प्रक्रिया पार पडली. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने स्मृती मांधनाच्या रुपात महागड्या खेळाडूला विकत घेतलं. अमेरिकेतील एक खेळाडू प्रथमच भारतीय लीगमध्ये खेळणार आहे. तुम्हाला हे ऐतिहासिक ऑक्शन पाहता आलं नसेल, याबद्दल तुम्हाला सरासरी माहिती हवी असेल, तर या 10 पॉइंट्समधून लिलाव प्रक्रिया समजून घ्या.

10 पॉइंट्समधून समजून घ्या लिलाव प्रक्रिया

1 सर्व पाच फ्रेंचायजींनी मिळून 448 मधून एकूण 87 खेळाडूंना विकत घेतलं. लिलावात 90 स्लॉट्स होते. यात 3 रिक्त राहिले. एकूण 87 खेळाडूंमध्ये 30 परदेशी प्लेयर्स आहेत.

2 प्रत्येक टीमकडे ऑक्शनसाठी 12-12 कोटींची पर्स होती. म्हणजे एकूण 60 कोटी रुपये होते. लिलावाच्यावेळी एकूण 59.50 कोटी रुपये खर्च झाले.

3 भारताची स्टार प्लेयर स्मृती मांधना सर्वात महागडी खेळाडू ठरली. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने तिला 3.40 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं.

4 सर्वात महागड्या परदेशी खेळाडूंचा रेकॉर्ड दोन ऑलराऊंडर्सच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियाची ऐश्ली गार्डनर (गुजराज जायंट्स) आणि इंग्लंडची नॅट सिवर (मुंबई इंडियन्स) यांना 3.20 कोटी रुपये मिळाले.

5 RCB, दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्सने प्रत्येकी 18 प्लेयर्सचा स्क्वाड तयार केला. यूपी वॉरियर्सने सर्वात कमी 16 आणि मुंबई इंडियन्सने 17 खेळाडूंचा स्क्वाड बनवला.

6 लिलावात यूपी वॉरियर्स आणि मुंबई इंडियन्सने पर्समधील सर्व रक्कम 12 कोटी रुपये खर्च केले. दिल्लीने सर्वाधिक 35 लाख रुपये वाचवले. गुजरातने 5 लाख आणि बँगलोरने 10 लाख रुपयांची बचत केली.

7 लिलावात विक्री झालेल्या 87 पैकी 20 खेळाडूंना 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम मिळाली. यात सर्वाधिक 10 खेळाडू भारताचे आहेत. 5 प्लेयर्स ऑस्ट्रेलियाचे आहेत. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडचे प्रत्येकी 2-2 प्लेयर्स आहेत.

8 WPL च्या पहिल्या लिलावात ऑलराऊंडर्सवर सर्वाधिक रक्कम खर्च झाली. टॉप 20 पैकी 11 ऑलराऊंडर्स आहेत. 9 पहिल्यांदा भारतातील T20 लीगमध्ये अमेरिकेतील खेळाडू खेळणार आहे. संयुक्त राज्य अमेरिकेची गोलंदाज तारा नॉरिसला 10 लाख रुपयांच्या बेस प्राइसमध्ये दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतलं.

10 परदेशी खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाच्या सर्वाधिक 14, इंग्लंडच्या 7, दक्षिण आफ्रिकेच्या 4 तेच न्यूझीलंडचे 2 प्लेयर्स आहेत. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेचा प्रत्येकी एक प्लेयर आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.