IPL 2022: ऋदिमान साहाने सोडली संघाची साथ, थांबवूनही नाही थांबला, Whatsapp ग्रुपही सोडला
IPL 2022: इंडियन प्रिमीयर लीगच्या (IPL) 15 व्या सीजनमध्ये शेवटचे दोन सामने बाकी आहेत. त्यानंतर रणजी मोसमाला सुरुवात होईल. त्याआधी भारताचा विकेटकीपर ऋदिमान साहाने (wriddhiman saha) आपल्या गृहराज्याच्या टीमची साथ सोडली आहे.
मुंबई: इंडियन प्रिमीयर लीगच्या (IPL) 15 व्या सीजनमध्ये शेवटचे दोन सामने बाकी आहेत. त्यानंतर रणजी मोसमाला सुरुवात होईल. त्याआधी भारताचा विकेटकीपर ऋदिमान साहाने (wriddhiman saha) आपल्या गृहराज्याच्या टीमची साथ सोडली आहे. रणजी सीजनमध्ये (Ranji season) मी तुमच्याकडून खेळणार नाही, असं ऋदिमान साहाने पश्चिम बंगाल क्रिकेट संघटनेला कळवलं आहे. या निर्णयासह ऋदिमान साहाचं पश्चिम बंगाल क्रिकेट संघटनेबरोबरच नातं संपुष्टात आलं आहे. 2007 मध्ये ऋदिमान साहाने पशिचम बंगाल क्रिकेट संघातून रणजीमध्ये डेब्यु केला होता. तो बंगालसाठी 122 फर्स्ट क्लास आणि 102 लिस्ट-ए सामने खेळला. साहा सध्या आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्ससाठी खेळतोय. ही टीम आयपीएल फायनलमध्ये पोहोचली आहे. ऋदिमान साहा गुजरात टायटन्ससाठी सलामीवीराची भूमिका बजावतोय.
कॅबचे अध्यक्ष म्हणाले….
“बंगालचा संघ रणजी ट्रॉफीच्या नॉकआउट्स स्टेजमध्ये खेळणार आहे. अशावेळी ऋदिमान साहाने पश्चिम बंगालकडून खेळावं अशी इच्छा होती. मी साहाशी या विषयावर बोललो व निर्णयावर पुनर्विचार करायला सांगितला. पण तो रणजी नॉकआउट्स खेळण्यासाठी इच्छुक नाहीय” असं कॅबचे अध्यक्ष अभिषेक डालमिया म्हणाले.
मागितली तर NOC देणार
“ऋदिमान साहाने अजून NOC प्रमाणपत्र मागितलेलं नाही. पण ते मागितलं तर नकार देणार नाही” असं कॅबच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं. “आम्ही साहाला राजी करण्याचे बरेच प्रयत्न केले. त्याचे लहानपणीचे कोच जयंत भौमिकच्या माध्यमातूनही प्रयत्न केले. पण त्याचा उपयोग झाला नाही. बंगालकडून पुन्हा खेळायचं नाही, हे साहाने ठरवलय. त्याने NOC मागितली, तर त्याला ती दिली जाईल” असं कॅबचे अधिकारी म्हणाले.
Whatsapp ग्रुपही सोडला
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, ऋदिमान साहाने पश्चिम बंगाल क्रिकेट संघाचा Whatsapp ग्रुपही सोडला आहे. पश्चिम बंगलाच्या कोचिंग स्टाफचा सदस्य म्हणाला की, “मी साहाच्या निर्णयावर काही बोलणार नाही. आता चित्र स्पष्ट झालय. त्यानुसार आम्ही प्लानिंग करु” ऋदिमान साहाने भारतीय संघातूनही खेळलाय. श्रीलंका कसोटी मालिकेसाठी डच्चू दिल्यानंतर साहाने काही वक्तव्य केली होती. त्यामुळे तो वादात सापडला होता.