Wriddhiman Saha: ऋद्धिमान साहाला धमकावणाऱ्या पत्रकाराचं नाव समोर आलं, मानहानीची नोटीस पाठवणार

भारतीय क्रिकेट संघातील (Indian Cricket Team) वरिष्ठ विकेटकीपर ऋद्धिमान साहाला कथितरित्या धमकावणाऱ्या पत्रकाराचं (Wriddhiman Saha Journalist Threat) नाव अखेर समोर आलं आहे.

Wriddhiman Saha: ऋद्धिमान साहाला धमकावणाऱ्या पत्रकाराचं नाव समोर आलं, मानहानीची नोटीस पाठवणार
ऋद्धिमान साहा प्रकरण
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 10:50 AM

मुंबई: भारतीय क्रिकेट संघातील (Indian Cricket Team) वरिष्ठ विकेटकीपर ऋद्धिमान साहाला कथितरित्या धमकावणाऱ्या पत्रकाराचं (Wriddhiman Saha Journalist Threat) नाव अखेर समोर आलं आहे. शनिवारी पाच मार्चला साहाने भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या चौकशी समितीसमोर आपली बाजू मांडली व पत्रकाराचं नाव सांगितलं. त्यानंतर ऋद्धिमान साहाने त्या पत्रकाराची ओळख सार्वजनिक केली नाही. पण रात्री स्वत:च त्या पत्रकाराने आपली ओळख उघड केली. पश्चिम बंगालचे सीनियर पत्रकार आणि युट्यूब शो चालवणारे बोरिया मुजूमदार (Boria Majumdar) यांनी स्वत: सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात त्यांनी ऋद्धिमान साहाने आपलं नाव घेतल्याचं त्यांनी सांगितलं. साहाने आमच्या दोघांमध्ये झालेल्या बोलण्याला चुकीच्या पद्धतीने सादर केलं, असा आरोप बोरिया मुजूमदार यांनी केला आहे. ऋद्धिमान साहाला मानहानीची नोटीस पाठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

स्क्रिनशॉट शेअर केले होते

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघातून वगळण्यात आल्यानंतर साहाने 19 फेब्रुवारीला एक टि्वट केलं होतं. यात सिनियर पत्रकार धमकावत असल्याचं सहाने म्हटलं होतं. त्याने बोरिया मुजूमदार यांच्यासोबत झालेल्या Whatsapp chat चे काही स्क्रिनशॉट शेअर केले होते. साहाने त्यावेळी नाव जाहीर केले नव्हते. साहाने मुलाखतीला नकार देऊन अपमान केल्याचा मजकूर त्या स्क्रिनशॉट मध्ये होता. ते पत्रकार बोरिया मुजूमदार असल्याची सोशल मीडियावर चर्चा होती. अखेर काल ते नाव उघड झालं.

साहाने खळबळजनक गौप्यस्फोट केला होता

श्रीलंका सीरीजसाठी काल संघनिवड जाहीर झाल्यानंतर ऋद्धिमान साहाने खळबळजनक गौप्यस्फोट केला होता. त्याला सुद्धा संघातून वगळण्यात आलं आहे. “इथून पुढे संघनिवडीसाठी तुझा विचार होणार नाही. त्यामुळे तू आता निवृत्तीचा विचार कर” असं हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या नेतृत्वाखालील संघ व्यवस्थापनाने आपल्याला सांगितलं, असा दावा ऋद्धिमान साहाने केला होता.

काय होता तो मेसेज

BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या संदर्भातही ऋद्धिमान साहाने वक्तव्य केलं होतं. कानपूर कसोटीत मी न्यूझीलंड विरुद्ध नाबाद 61 धावांची खेळी केली. त्यावेळी सौरव गांगुली यांच्याकडून मला एक व्हॉट्स अॅप मेसेज आला होता. त्यामध्ये ‘जो पर्यंत मी BCCI मध्ये आहे, तो पर्यंत तू संघामध्ये राहशील’ असं लिहिलं होतं. सौरव गांगुलीकडून आलेल्या त्या मेसेजने माझा आत्मविश्वास वाढवला. पण आता अचानक सर्वकाही बदललं आहे, असं ऋद्धिमान साहाने सांगितलं.

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.