WTC Final Weather Update : इंग्लंडच्या साऊदम्पटन येथील मैदानात सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना (ICC WTC Final) ऐन रंगात आला आहे. पहिल्या दिवशीपासून पाऊस, कमी सूर्यप्रकाश अशा हवामानासंबधी बाबींच्या अडथळ्यामुळे प्रत्येक दिवशी आजतरी सामना होईल का? होईल तर किती ओव्हर्सचा? असे प्रश्न क्रिकेट रसिकांसमोर असतात. अशावेळी मदतीला धावून येत आहे तो म्हणजे भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) जो कॉमेन्ट्रीसाठी इंग्लंडमध्ये उपस्थित आहे. दिनेशने याआधी प्रत्येक दिवशी सर्वांत आधी साऊदम्पटन मैदानातील हवामानाची स्थितीबाबत कळवले असून आजच्या दिवसाबाबतही दिनेशने महत्त्वाची माहिती देत फोटो शेअर केले आहेत. (WTC Final 2021 india vs New Zealand Match 6th days Southampton Weather Forecast from Southampton ground Latest Photos Shared By Dinesh Karthik)
दिनेशने शेअर केलेल्या फोटोमध्ये हवामान साफ असून मैदानात काही प्रमाणआत सूर्यप्रकाश पडलेलाही दिसून येत आहे. दिनेशने फोटोना आतापर्यंतच्या सामन्यातील दिवसांपैकी आजचं हवामान सर्वांत चांगलं आहे. असं कॅप्शनही दिल्यामुळे क्रिकेट प्रेमींची उत्सुकता आणखीच वाढली आहे.
We are clear for the FINAL Day! ?
This has been the best weather so far I’ve been here.Final assignment for Weatherman DK ✅#WTCFinal #WTC21final pic.twitter.com/PUUEM7rb69
— DK (@DineshKarthik) June 23, 2021
सर्वात आधी न्यूझीलंडने टॉस जिंकून गोलंदाजी घेतली. भारताला 217 धावांवर ऑलआऊट करुन न्यूझीलंडने 249 धावा केल्या आणि भारतावर 32 रनांची आघाडी मिळवली. त्यानंतर भारत आता आपला दुसरा डाव खेळत असून पाचव्या दिवसाखेर भारताची स्थिती 64 वर 2 बाद अशी आहे. सध्या विराट (8) आणि पुजारा (12) खेळत आहेत.
हे ही वाचा :
WTC Final : ‘सुपरमॅन’ शुभमन, चित्त्यासारखी झेप घेत पकडला झेल, सोशल मीडियावर कौतुकाचा पाऊस
WTC Final : टॉवेल बाधून मैदानात उतरला मोहम्मद शमी, फोटो पाहून चाहते लोट-पोट, म्हणाले सावरीया 2.0
WTC Final 2021 : फायनल सामना ड्रॉ झाला तर भारताला मोठं नुकसान, न्यूझीलंड फायद्यात!
(WTC Final 2021 india vs New Zealand Match 6th days Southampton Weather Forecast from Southampton ground Latest Photos Shared By Dinesh Karthik)