WTC फायनलपूर्वी विराटला धक्का, आपल्याच टीमचा खेळाडू पाठीमागून वार करण्याच्या तयारीत!

न्यूझीलंडचा काईल जॅमिसन जो आयपीएल स्पर्धेत बंगळुरुकडून विराटच्या नेतृत्वाखाली खेळतो. तो आता भारताच्या टीमवर पर्यायाने स्वत:च्या कर्णधारावर आक्रमण करण्यास सज्ज झालाय. (WTC Final 2021 New Zealand kyle jamieson Will Be big threat IPL team RCb Captain Virat kohli)

WTC फायनलपूर्वी विराटला धक्का, आपल्याच टीमचा खेळाडू पाठीमागून वार करण्याच्या तयारीत!
विराट कोहली
Follow us
| Updated on: Jun 17, 2021 | 7:15 AM

मुंबई : न्यूझीलंड विरुद्ध (India vs New Zealand WTC Final) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (WTC Final 2021) सुरु व्हायला केवळ काही तासांचा अवधी बाकी आहे. उद्यापासून म्हणजे 18 जूनपासून साऊथॅम्प्टनच्या रोझ बाऊल स्टेडियमवर सुरू होणाऱ्या या सर्वात मोठ्या सामन्यासाठी भारतीय संघाची तयारी पूर्ण झाली आहे, परंतु भारतीय कर्णधार विराट कोहलीला टेन्शन आहे. ते नेमकं काय? तर, कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या विजेतेपदाच्या सामन्यात दोन्ही संघांचे खेळाडू आपला संघ जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. पण या दरम्यान कर्णधार विराट कोहलीला स्वतःच्या संघाच्या वेगवान गोलंदाजाची चिंता करावी लागेल. हा गोलंदाज जो विराटच्या संघाचा सदस्य असूनही कसोटी क्रिकेटच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये त्याच्याविरुद्ध धोकादायक ठरणार आहे. तो गोलंदाज आहे न्यूझीलंडचा काईल जॅमिसन… जो आयपीएल स्पर्धेत बंगळुरुकडून विराटच्या नेतृत्वाखाली खेळतो. तो आता भारताच्या टीमवर पर्यायाने स्वत:च्या कर्णधारावर आक्रमण करण्यास सज्ज झालाय. (WTC Final 2021 New Zealand kyle jamieson Will Be big threat IPL team RCb Captain Virat kohli)

आयपीएलमधील काईलची कामगिरी

6 फूट 3 इंचाच्या न्यूझीलंडचा उजव्या हात वेगवान गोलंदाज काइल जॅमिसनने यंदा इंडियन प्रीमियर लीगमध्ये पदार्पण केलं. वास्तविक, आयपीएल 2021 च्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने जॅमिसनची संघात भर घातली. जॅमिसनची संघात भर घालण्यासाठी आरसीबीने तब्बल 15 कोटी रुपये खर्च मोजले. अर्थात, आयपीएलचा सध्याचा 14 वा हंगाम कोरोना व्हायरसमुळे स्थगित करण्यात आला.

पण त्याआधीही जॅमिसनने विराटकडून खेळताना आपल्या 15 कोटी रुपयांची परतफेड करुन दिली आहे. या मोसमात जॅमिसनने नऊ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला, तर फलंदाजी करताना त्याने 19.66 सरासरीने आणि 143.90 च्या स्ट्राईक रेटने 41 चेंडूत 59 धावा केल्या.

26 वर्षांचा काईल, आतापर्यंत 6 टेस्ट, बॅट आणि बॉलने कमाल केलीय!

धिप्पाड देहाचा आणि उंचपुरा काईल जॅमिसन 26 वर्षांचा आहे आणि त्याने आतापर्यंत न्यूझीलंडसाठी 6 कसोटी, 5 एकदिवसीय आणि 8 टी -20 सामने खेळले आहेत. या 6 कसोटीत त्याने 36 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवलाय. यादरम्यान, 48 धावा देऊन 6 बळी, ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरलीय.

जॅमिसनने केवळ बॉलनेच आपला करिश्मा दाखवलाय असं नाही तर त्याने आपल्या बॅटची ताकदही दाखवली आहे. फलंदाजी करताना त्याची सरासरी 56.50 आहे. कसोटी सामन्यात त्याने नाबाद एकमेव अर्धशतकाच्या मदतीने 226 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये, जॅमीसनने 34 सामने खेळले आहेत आणि 128 विकेट्स घेतल्या आहेत.

(WTC Final 2021 New Zealand kyle jamieson Will Be big threat IPL team RCb Captain Virat kohli)

हे ही वाचा :

ICC WTC Final : फायनलला दोन दिवस उरले, न्यूझीलंडचा संघ पार्टीत मश्गुल, पार्टीचा Video

WTC Final : भारत की न्यूझीलंड, कोण जिंकणार? जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिनने वर्तवला ‘हा’ अंदाज

WTC Final: विराटसह करोडो भारतीयांच्या स्वप्नांचा चक्काचूर होऊ शकतो, कारण…

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.