WTC Final 2021 : टॉस जिंकल्यावर भारताने बॅटिंग करावी की फिल्डिंग?, गांगुलीचा विराटला महत्त्वाचा सल्ला

भारतीय संघाने पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा प्रयत्न करावा कारण विदेशात भारतीय संघाने प्रथम बॅटिंग केल्यानंतर जिंकण्याचे चान्सेस वाढतात, असं गांगुली म्हणाला. (WTC Final 2021 Sourav ganguly Says team india Will be Should bat First)

WTC Final 2021 : टॉस जिंकल्यावर भारताने बॅटिंग करावी की फिल्डिंग?, गांगुलीचा विराटला महत्त्वाचा सल्ला
विराट कोहली आणि सौरव गांगुली
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 11:25 AM

मुंबई :  ज्या भारतीय कर्णधाराने विदेशात जाऊन प्रतिस्पर्ध्यांना त्यांच्यात भूमीत पाणी पाजायला शिकवलं, जो खऱ्या अर्थाने नडला, भिडला आणि जिंकला, भारताला परदेशात विजयाची स्वप्न दाखवली आणि केवळ दाखवूनच थांबला नाही तर अनेक अविस्मरणीय मालिकाही जिंकून दिल्या, तो कर्णधार म्हणजे टीम इंडियाचा दादा सौरव गांगुली…! (Sourav ganguly) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्याला (WTC Final 2021) सुरुवात व्हायला अगदी काही तासांचा अवधी शिल्लक आहे. या सामन्यात टॉस हा महत्त्वाचा फॅक्टर आहे. याच पार्श्वभूमीवर दादाने विराटला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. (WTC Final 2021 Sourav ganguly Says team india Will be Should bat First)

पहिल्यांदा बॅटिंग करावी की फिल्डिंग?

अंतिम सामन्याचं मैदान मारणं ही भारतासाठी सर्वांत मोठी संधी आहे. माझ्या कर्णधार विराटसह सगळ्या संघाला शुभेच्छा आहेत. सगळ्याच खेळाडूंनी मोठ्या मेहनीतने इथपर्यंतचा प्रवास केलाय. त्यांच्या मेहनतीमुळेच भारतीय संघ आज अंतिम सामना खेळतो आहे. अंतिम सामना खेळताना संघावर दबाव जरुर असेल. पण भारतीय टीमने दबाव झुगारन खेळावं. अंतिम सामन्यात जर भारताने टॉस जिंकला तर विराटने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घ्यावा, असा सल्ला गांगुलीने दिला आहे.

सौरव गांगुली काय म्हणाला?

भारतीय संघाने पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा प्रयत्न करावा कारण विदेशात भारतीय संघाने प्रथम बॅटिंग केल्यानंतर जिंकण्याचे चान्सेस वाढतात. भारतीय संघाचं विदेशातलं रेकॉर्ड पाहिलं असता आपल्याला दिसून येईल की विदेशात भारताने प्रथम बॅटिंग केल्यानंतर सामने अधिक जिंकलेले आहेत, असंही गांगुली म्हणाला.

सलामीवीरांवर सामन्याची मदार

सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी एका मजबूत ओपनिंग भागिदारीची गरज असल्याचं सौरव गांगुलीनं सांगितलं. परदेशात खेळताना भारतीय संघाकडून सलामीवीरांची जबाबदारी महत्त्वाची असते. याआधी वीरेंद्र सेहवाग होता, जो ही कामगिरी चोख पार पाडायचा. त्यामुळे आता अनुभवी रोहित शर्मा आणि युवा फलंदाज शुभमन गिलने हे शिवधनुष्य पेलणे गरजेचे असल्याचं गांगुली म्हणाला. तसंच या दोघांनी चांगला खेळ करत सुरुवात केल्यास पुढील फलंदाजानाही फलंदाजी करण सोपं जाईल असंही गांगुली म्हणाला.

भारताकडे तगडी गोलंदाजी

भारताच्या गोलंदाजीबद्दल बोलताना गांगुली म्हणाला, “भारताकडे सध्या तगडे गोलंदाज आहे. भारताचे सध्याचे गोलंदाज प्रतिस्पर्धी संघाच्या 20 विकेट्स घेण्याची ताकद ठेवतात. फक्त फलंदाजाना 300 ते 350 सारखे चांगले लक्ष्य इंग्लंडसमोर ठेवण्याची गरज आहे.”

(WTC Final 2021 Sourav ganguly Says team india Will be Should bat First)

हे ही वाचा :

WTC Final India vs New Zealand live streaming : भारत विरुद्ध न्यूझीलंड, सामना कुठे आणि कधी? या ठिकाणी पाहा Live

WTC Final 2021 : बुमराहची सामन्याअगोदर बायको संजनाला मुलाखत, ‘तो’ प्रश्न विचारताच लाजेने चुर्रर्र झाला!

WTC Final Weather Update : आज किती ओव्हर्सचा खेळ होणार, पाऊस पडणार का, हवामान कसं असणार? वाचा हा रिपोर्ट

Non Stop LIVE Update
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.