Mohammed Shami | शमीचा नाद नाय! Marnus Labuschagne क्लिन बोल्ड, पाहा Video
Mohammad Shami Dismissed Marnus Labuschagne | मोहम्मद शमी याने आयपीएल 16 व्या मोसमातील कामगिरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये कायम ठेवलीय. शमीने मार्नसला क्लिन बोल्ड केलं.
लंडन | मोहम्मद शमी याने टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप फायनल सामन्यातील दुसऱ्या सत्रात शानदार सुरुवात करुन दिली. मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेन याला क्लिन बोल्ड केलं. शमीने लाबुशेनचा जबरदस्त बॉलवर त्रिफळा उडवला. ऑस्ट्रेलियाने मार्नसच्या रुपात तिसरी विकेट गमावली. शमीने ज्या पद्धतीने मार्नसला आऊट केलं त्यासाठी त्याचं कौतुक होतंय. शमी काही सेकंदात ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या सत्रात लंचपर्यंत 2 विकेट्स गमावून 23 ओव्हरमध्ये 73 धावा केल्या.मार्नस लाबुशेन 26 आणि स्टीव्हन स्मिथ 2 धावांवर नाबाद खेळत होते. लंचनंतर दोघेही मैदानात आले. शमी 25 वी ओव्हर टाकायला आला. शमीने टाकलेला बॉल पुढे पडला आणि आतल्या बाजुला घुसला. शमीने टाकलेला हा क्लास बॉल मार्नसला समजला नाही आणि इथेच गेम झाला.
शमीने मार्नसला आऊट केल्याने टीम इंडियाची दुसऱ्या सत्रात शानदार सुरुवात झाली. लाबुशेन याने 62 बॉलमध्ये 3 चौकारांच्या मदतीने 26 धावांची खेळी केली. मार्नस आयसीसी टेस्ट रॅकिंगमध्ये अव्वल स्थानी आहे. मात्र हा नंबर 1 बॅट्समन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये मात्र सपशेल अपयशी ठरला.
व्हॉट अ बॉल
SHAMMMIIIIIII ?What a delivery to get the wicket of Labuschagne ? #WTCFinal2023 | #WTCFinal | #INDvsAUS | #shami pic.twitter.com/qFLy9qDPY0
— Gøwtham (@Gowthiss) June 7, 2023
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी दोन्ही टीम
WTC Final साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार
WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया | पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, मायकेल नेसर, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.
राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.