Ind vs Aus WTC Final : टीम इंडिया पिछाडीवर, पण हरलेली नाही, विजय मिळवण्याचे अजूनही आहेत 4 मार्ग
India vs Australia,WTC 2023 : ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या आहेत. दुसऱ्या दिवसअखेर भारताची स्थिती खराब आहे. भारताची स्थिती 5 बाद 151 आहे. म्हणजे निम्मा संघ तंबूत परतलाय. जिंकायच असेल, तर टीम इंडियाला खेळाचा स्तर उंचावावा लागेल.
लंडन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताची स्थिती खराब आहे. दुसऱ्या दिवशीच ऑस्ट्रेलियन माऱ्यासमोर भारताने गुडघे टेकले आहेत. टीम इंडियाची फलंदाजी पाहून सामना भारताच्या हातून निसटतोय अशी स्थिती आहे. टीम इंडियाचा पुढचा प्रवास कठीण झालाय. ऑस्ट्रेलियन टीम भारतावर दबाव बनवण्याची संधी सोडणार नाही. पण अजूनही भारताच्या अपेक्षा पूर्णपणे संपलेल्या नाहीत.
कसोटीत अजून 3 दिवसांचा खेळ शिल्लक आहे. रोहित शर्माची सेना द ओव्हलवर अजूनही पलटवार करु शकते. दुसऱ्यादिवशी ऑस्ट्रेलियाचा डाव 469 धावांवर संपला. ट्रेविस हेड आणि स्टीव स्मिथने शानदार शतक ठोकलं. ऑस्ट्रेलियाचा डाव 400 पार पोहोचल्याने भारताच्या अडचणी वाढल्या. टीम इंडियाची टॉप ऑर्डर काल फ्लॉप ठरली. कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिल लवकर तंबूत परतले. 4 बाद 71 अशी स्थिती झाली होती.
अपेक्षा अजून संपलेल्या नाहीत
टीम इंडिया या कसोटीत पिछाडीवर पडली आहे. अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जाडेजाने 71 धावांची पार्ट्नरशिप करुन टीमची धावसंख्या 142 पर्यंत पोहोचवली. भारताकडे अजूनही किताब जिंकण्याची संधी आहे. टीम इंडियासाठी पुढचा मार्ग सोपा नाहीय. पण अपेक्षा अजूनही संपलेल्या नाहीत. पिछाडीवर पडल्यानंतर टीम इंडिया सर्वप्रथम फॉलोऑन टाळण्याचा प्रयत्न करेल. आजचा तिसरा दिवस खूप महत्वाचा आहे. टीम इंडियाला कमीत कमी 120 धावा आज बनवाव्या लागतील.
आज काय करावं लागेल?
अजिंक्य रहाणे 29 धावा करुन क्रीजवर आहे. तिसऱ्यादिवशी त्याला जास्तीत जास्तवेळ क्रीजवर टिकून फलंदाजी करावी लागेल. भारताला फॉलोऑन आलाच, तर त्यांना पहिल्या इनिंगमधील चूका टाळाव्या लागतील. कारण फॉलोऑन खेळूनही मॅच जिंकता येते. 2001 मध्ये भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध अशी कमाल केली होती. फॉलोऑन घेऊनही भारताने 171 धावांनी विजय मिळवला होता.
Stumps on Day 2 of the #WTC23 Final!#TeamIndia 151/5 at the end of day’s play and trail by 318 runs in the first innings.
Join us tomorrow for Day 3 action ????
Scorecard ▶️ https://t.co/0nYl21pwaw pic.twitter.com/dT7aOmDMWQ
— BCCI (@BCCI) June 8, 2023
अशी पार्ट्नरशिपची गरज
भारताला एका मोठ्या भागीदारीची आवश्यकता आहे. वीवीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविडने 2001 मध्ये केली होती, तशी भागीदारी आता गरजेची आहे. दोघांमध्ये 376 धावांची पार्ट्नरशिप झाली होती. भारताला आता अशाच पार्ट्नरशिपची गरज आहे. चौघे टिकले, तर पराभवाचा धोका टळेल
पहिल्या डावात रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा फ्लॉप ठरले. चौघांपैकी एकही 15 रन्सच्या पुढे जाऊ शकला नाही. आता पुढच्या डावात या चौघांना जबाबदारी ओळखून मोठ्या इनिंग खेळाव्या लागतील. मागच्या चूकांमधून धडा घ्यावा लागेल. दुसऱ्याडावात हे चारही फलंदाज टिकले, तर भारताचा पराभवाचा धोका टळू शकतो,