Ajinkya Rahane : अजिंक्यच्या टीम इंडियातील निवडीसाठी पडद्यामागे MS Dhoni ने काय केलं? कमबॅकची Inside Story

Ajinkya Rahane : अजिंक्यच्या टीम इंडियातील कमबॅकआधी पडद्यामागे काय घडलं? कोणी-कोणाला फोन केले? अचानक अजिंक्य रहाणेच्या बाबतीत बीसीसीआयच मन कधी बदललं? जाणून घ्या सर्व Inside Story.

Ajinkya Rahane : अजिंक्यच्या टीम इंडियातील निवडीसाठी पडद्यामागे MS Dhoni ने काय केलं? कमबॅकची Inside Story
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 2:59 PM

चेन्नई : चेन्नई सुपर किंग्स आणि एमएस धोनी खेळाडूंना घडवतो. प्रवाहाबाहेर गेलेल्य़ा खेळाडूंना पूनर्जन्म देण्यासाठी CSK आणि धोनी ओळखला जातो. एखादा खेळाडू कितीही संघर्ष करत असला, तरी एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना त्याला हरवलेला आत्मविश्वास परत मिळतो. त्या खेळाडूची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरु होते. अजिंक्य रहाणे याच उत्तम उदहारण आहे. आज अजिंक्यचा खेळ पाहून अनेकांना विश्वास बसत नाहीय.

अजिंक्य रहाणेच करियर संपलं असं अनेकांना वाटत होतं. आयपीएलमध्ये त्याला कोणी विकत घ्यायला तयार नव्हतं. अखेर एमएस धोनीच्या सीएसकेने अजिंक्यला त्याच्या बेस प्राइसला 50 लाख रुपयांना विकत घेतलं.

कोट्यवधी कमावणाऱ्या खेळाडूंपेक्षा सरस खेळ

आज तोच अजिंक्य रहाणे आयपीएलमध्ये कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या खेळाडूंपेक्षा सरस खेळ दाखवतोय. अजिंक्यने अनेकांचे अंदाज चुकवलेत. त्याच्या भरारीने थक्क करुन सोडलय. रणजी ट्रॉफी स्पर्धेतील धावा आणि आयपीएल 2023 मधील कामगिरीमुळे अजिंक्य रहाणेला पुन्हा एकदा टीम इंडियात स्थान मिळालय.

एका फॉन कॉलमुळे घडलं?

अजिंक्य रहाणेची WTC 2023 च्या फायनलसाठी निवडलेल्या टीममध्ये कशी निवड झाली? फक्त आयपीएलमधील कामगिरीच्या आधारावर तो टीममध्ये कसा आला? असे प्रश्न अनेकांना पडलेत. आता अजिंक्य रहाणेची टीम इंडियात निवड कशी झाली? पडद्यामागे कोणी काय केलं? ते सगळ समोर आलय. टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड यांनी एमएस धोनीला फोन केला नसता, तर हे शक्य झालं नसतं. धोनीने, द्रविड यांना अजिंक्य बद्दल जे सांगितलं, त्याने जे निरीक्षण नोंदवलं, त्यामुळे अजिंक्यची टीम इंडियात निवड झाली.

त्यावेळी अजिंक्यचा विचार सुरु झाला

“श्रेयस अय्यरला दुखापत झाल्यानंतर अजिंक्य रहाणे नेहमीच आमच्या प्लानचा भाग होता. त्याच्याकडे इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव आहे, तिथे तो यशस्वी सुद्धा ठरलाय. पण वर्षभरापासून तो टीमचा भाग नव्हता. आम्ही फक्त त्याला रणजी ट्रॉफीमध्ये परफॉर्म करताना पाहिलं होतं. त्यामुळे राहुलने एमएस धोनीच मत जाणून घेतलं” असं वरिष्ठ बीसीसीआय अधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्ट्ला सांगितलं. कोणाला वाटत होतं अजिंक्य आणखी एक संधी द्यावी ?

श्रेयस अय्यर दुखापतीमुळे WTC च्या फायनलमध्ये खेळणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर टीम मॅनेजमेंट खासकरुन राहुल द्रविड आणि रोहित शर्मा अजिंक्य रहाणेला आणखी एक संधी द्यावी, या मताचे होते. अजिंक्य रहाणे आयपीएलच्या चालू सीजनमध्ये जबरदस्त प्रदर्शन करतोय. चेन्नई सुपर किंग्सच्या विजयात त्याचं महत्वाच योगदान आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.