ICC WTC Final : भारत आणि न्यूझीलंडमधील सामना डेन्मार्कमध्ये ? वाचा काय आहे नेमकं प्रकरण

भारत आणि न्‍यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिपच्या (ICC World Test Championship Final)अंतिम सामन्याचा पहिला दिवस पावसाने खराब केला. त्यामुळे खेळाडूंसह सर्वच क्रिकेटरसिक नाराज झाले.

ICC WTC Final : भारत आणि न्यूझीलंडमधील सामना डेन्मार्कमध्ये ? वाचा काय आहे नेमकं प्रकरण
केन विल्यमसन आणि विराट कोहली
Follow us
| Updated on: Jun 19, 2021 | 1:35 PM

मुंबई : भारत आणि न्‍यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिपच्या (ICC World Test Championship Final)अंतिम सामन्याचा पहिला दिवस पावसाने खराब केला. त्यामुळे खेळाडूंसह सर्वच क्रिकेटरसिक नाराज झाले. पुढील काही दिवस साऊथॅम्पटनमध्ये (Southampton) पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आताच समोर आलेल्या माहितीनुसार आजचे वातावरण खेळण्यायोग्य असले तरी इंग्लंडच्या वातावरणाचा काही नेमका अंदाज बांधता येणार नसल्याने सामना कधी सुरु होणार याबाबत साशंकता आहे. त्यात डेन्मार्क क्रिकेट फेडरेशनने थेट बीसीसीआयला (BCCI) त्यांच्या इथे वातावरण साफ असल्याचं सांगत अप्रत्यक्षपणे सामना डेन्मार्कमध्ये खेळवू शकता असे मिश्किल ट्विट केले आहे. (WTC Final In Southampton Day 1 Washout Denmark Federation offers to Host IND vs NZ match)

डेन्मार्क देशाचा क्रिकेट संघ अद्याप तितका चांगला खेळ करत नसल्याने अजूनपर्यंत त्याचा संघ क्रिकेट विश्वचषकासाठीही पात्र ठरलेला नाही. डेन्मार्कचा फुटबॉल संघ ताकदवर असला तरी क्रिकेटमध्ये त्यांना हवी तशी कामगिरी करता आलेली नाही.

आज सामना सुरु होण्याची दाट शक्यता

पहिल्या दिवशीचा खेळ रद्द झाल्यामुळे आजतरी सामना सुरु होतोका याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान कॉमेन्ट्रीसाठी तिथे उपस्थित असलेल्या दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) मैदानाचे ताजे फोटो शेअर केले आहेत. कार्तिकने शेअर केलेल्या फोटोमध्ये मैदानावर चांगल ऊन पडलं असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे असेच वातावरण राहिल्यास या बहुप्रतीक्षीत सामन्याला नक्की सुरुवात होईल.

सामन्याच्या वेळेत बदल

पहिल्या दिवशीचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी अर्धा तास आधी म्हणजेच भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरु केला जाईल. तसेच पावसाने पुन्हा खोडा न घातल्यास संपूर्ण 98 ओव्हरचा खेळ खेळवला जाईल. तसेच पावासाने पुन्हा व्यत्यय आणल्यास 60 ते 70 ओव्हरचा खेळही खेळवला जाऊ शकतो. मात्र इंग्लडच्या हवामानाबाबत कोणतीही पुष्टी केली जाऊ शकत नसल्याने वातावरण कधीही बदलण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. जी काही परिस्थिती आहे ती पुढील काही तासांतच स्पष्ट होईल.

हे ही वाचा :

WTC Final Weather Update : साऊथॅम्प्टनमधून आनंदाची बातमी, क्रिकेटपटूने शेअर केले ताजे फोटो, मॅचची वेळही बदलली

Ind vs NZ : पहिल्या दिवसाचा खेळ रद्द् झाल्यावर, खेळाडू रंगले ‘या’ खेळात, पाहा व्हिडीओ

WTC अंतिम सामन्यात भारताची बॅटिंग ऑर्डर कशी असेल? याअगोदर साऊथॅम्प्टन कुणाची कामगिरी कशी?

(WTC Final In Southampton Day 1 Washout Denmark Federation offers to Host IND vs NZ match)

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.