WTC Final : भारत की न्यूझीलंड, कोण जिंकणार? जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिनने वर्तवला ‘हा’ अंदाज

कसोटी क्रिकेटचा विश्वचषक समजला जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याची सुरुवात 18 जूनला होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विजयश्री कोण नेणार? याचे अनेक अंदाज वर्तवले जात आहेत.

WTC Final : भारत की न्यूझीलंड, कोण जिंकणार? जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिनने वर्तवला 'हा' अंदाज
ind vs nz win predictions
Follow us
| Updated on: Jun 16, 2021 | 7:04 PM

मुंबई : आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असणारे संघ म्हणजे भारत (India) आणि न्यूझीलंड (NewZeland) . या दोन दिग्गज संघात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (ICC World Test Championship)  अंतिम सामना (WTC Final) खेळवला जाणार आहे. कसोटी क्रिकेटचा विश्वचषक समजला जाणाऱ्या या सामन्याची सुरुवात भारतीय प्रमाणवेळेनुसार 18 जूनला दुपारी तीन वाजता होईल. दोन्ही संघ तोडीस तोड असल्याने विजयश्री कोण नेणार? याचे अनेक अंदाज वर्तवले जात आहेत. त्यामध्ये गूगल बाबाने अर्थात गूगल सर्च इंजिनने (Google) ही आपला अंदाज वर्तवला आहे. यामध्ये कोणता संघ जिंकण्याची किती टक्के अपेक्षा आहे? तसेच किती टक्के सामना ड्रॉ होण्याची अपेक्षा आहे? या सर्व गोष्टींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (WTC Final Match in India vs New Zealand Googles wtc win prediction says India Will Win)

भारताच्या विजयाबाबतचा गूगलचा अंदाज

जगभरातील कोणतीही माहिती मिळवण्यासाठी अनेक वर्षांपासून गूगल सर्च इंजिनचाच वापर करण्यात येतो. अनेक सर्च इंजिन असतानाही गूगलवर नेटकरी सर्वाधिक अवलंबूंन असतात. त्यामुळे गूगलही सर्व प्रकारची माहिती नेटीझन्सना पुरवत असून ब्रेकिंग घडामोडींपासून ते प्रत्येक प्रकारच्या क्रिडा सामन्याची संपूर्ण माहिती गूगलवर उपलब्ध असते. त्यात WTC Final या अत्यंत महत्त्वाच्या सामन्याबाबतही गूगलने आपला अंदाज वर्तवला असून गूगलच्या मते भारत जिंकण्याची टक्केवारी सर्वाधिक म्हणजे 37 टक्के इतकी आहे. तर न्यूझीलंडची जिंकण्याची टक्केवारी 34 टक्के आहे. तसेच सामना अनिर्णीत राहण्याची शक्यताही 29 टक्के असल्याचा अंदाज गूगलने वर्तवला आहे. याआधीचे दोन्ही संघातील सामने, दिग्गजांची मते, दोन्ही संघांचा सध्याचा फॉर्म या सर्वाच्या मदतीने गूगल हा अंदाज वर्तवत असतो.

google predictions wtc win

WTC Final मध्ये जिंकणाऱ्या संघाबाबत गूगल सर्च इंजिनने वर्तविलेला अंदाज

टीम इंडियाचे 15 शिलेदार

या महत्त्वाच्या सामन्यासाठी बीसीसीआयनं टीम इंडियाच्या 15 सदस्यांच्या नावांची घोषणा केली आहे. भारतीय संघात विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा,अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्धिमान साहा रविचंद्रन आश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज यांचा समावेश करण्यात आला आहे.

सामन्यात फिरकीला मदत

इंग्लंड क्रिकेटचे तज्ज्ञ मार्क निकॉल्स यांनी WTC Final वर महत्त्वपूर्ण मत मांडलंय. साऊदम्प्टनच मैदान (Southampton Ground) स्पिनर्ससाठी उपयुक्त ठरलं आहे. स्पिनरला तिथे मदत मिळते. ईएसपीएन- क्रिकइन्फोसाठी लिहिलेल्या लेखात साऊदम्प्टनची परिस्थिती त्यांनी अधिक स्पष्ट करुन सांगितली आहे. 2014 सालचं उदाहरण देत त्यांनी म्हटलंय, “हे एक चांगलं मैदान आहे तिथे चांगल्या सुविधा, चांगल्या आकाराच्या सीमारेषा आणि परिपूर्ण खेळपट्टी आहे. कोरड्या हवामानात इथे बॉल स्पिन होतो.2014 मध्ये मोईन अलीने आपल्या ऑफ-ब्रेकच्या चेंडूने इंग्लंडला भारताविरुद्ध विजय मिळवून दिला. त्याने भारताच्या 6 विकेट्स काढल्या होत्या. आता अश्विनही अशीच कमाल दाखवू शकतो. अश्विन या अंतिम सामन्यात धमाल करु शकतो”, असं त्यांनी म्हटलंय.

हे ही वाचा :

WTC Final: विराटसह करोडो भारतीयांच्या स्वप्नांचा चक्काचूर होऊ शकतो, कारण…

WTC Final : विजयी संघ होणार मालामाल, ICC च्या मानाच्या गदेसह मिळणार कोट्यावधी रुपये

WTC Final : जाणून घ्या कशी असेल अंतिम सामन्याची खेळपट्टी, भारतीय गोलंदाजाना फायदा होणार की तोटा?

(WTC Final Match in India vs New Zealand Googles wtc win prediction says India Will Win)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.