Yashasvi Jaiswal | यशस्वीवरुन नासीर हुसैनने थेट इंग्लंडच्या मोठ्या प्लेयरला सुनावलं, म्हणाला….
Yashasvi Jaiswal | टीम इंडियाचा स्टार ओपनर यशस्वी जैस्वाल बद्दल एका इंग्लिश खेळाडूने नको तो दावा केला. त्याला इंग्लंडचे माजी कर्णधार नासीर हुसैन यांनी उत्तर दिलं. नासीर हुसैन यांनी त्या इंग्लिश प्लेयरला चांगलच सुनावलं. त्यामुळे इंग्लिश खेळाडूंनी आता यावरुन वक्तव्य सुरु केली आहेत.
Yashasvi Jaiswal | इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसैनने विद्यमान इंग्लिश टीममधील एका मोठ्या प्लेयरल सुनावलं. इंग्लंडच्या या खेळाडूने यशस्वी जैस्वालवरुन नको तो दावा केला होता. यशस्वी जैस्वालने चालू कसोटी मालिकेत इंग्लिश गोलंदाजांना आपल्या बॅटचा तडाखा दाखवला. त्याने शतकी खेळी साकारल्या. त्यामुळे इंग्लिश खेळाडूंनी आता यावरुन वक्तव्य सुरु केली आहेत. आमच्या बेझबॉल क्रिकेटमुळे यशस्वी जैस्वाल आक्रमक क्रिकेट खेळला, असा दावा इंग्लिश फलंदाज बेन डकेटने केला होता. त्याला नासीर हुसैन यांनी उत्तर दिलं. टीम इंडियाने राजकोट कसोटी जिंकून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होण्याआधी बेन डकेटने हा दावा केला होता.
“यशस्वी जैस्वाल हा त्याच्या संगोपनातून, मेहनतीतून शिकला. देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी आणि इंडियन प्रीमियर लीगमधून यशस्वी जैस्वाल शिकला” असं नासीर हुसैनने सांगितलं. टीम इंडियाने तिसरा कसोटी सामना 434 धावांनी जिंकला. पण जैस्वालला सामनावीराचा पुरस्कार मिळाला नाही. टेस्ट क्रिकेटमध्ये दुसर द्विशतक झळकवल्याबद्दल क्रिकेट विश्वाने त्याच कौतुक केलं. यशस्वी जैस्वाल कसं खेळला ते इंग्लंड आणि डकेटने पहाव, त्यातून शिकाव असं हुसैनने म्हटलं आहे.
चालू सीरीजमध्ये यशस्वी जैस्वालने किती धावा केल्या?
“यशस्वी जैस्वाल आमच्याकडून शिकला, या कमेंटवर मी बोलणार आहे. जैस्वाल हे तुमच्याकडून शिकलेला नाही. तो त्याच्या संगोपनातून शिकलाय. लहानाचा मोठा होत असताना, त्याने जी मेहनत केली, त्यातून तो हे शिकला. आयपीएलमधून तो शिकला” असं नासीर हुसैन मायकल आर्थटनशी स्काय स्पोर्ट्सवरच्या पॉडकास्टमध्ये म्हणाला. चालू सीरीजमध्ये यशस्वी जैस्वाल सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. 6 डावात त्याने 545 धावा केल्या आहेत. 109 च्या सरासरीने आणि 81.1 च्या स्ट्राइक रेटने या धावा त्याने केल्यात.
‘टीका सहन करायला तयार रहा’
“बेझबॉल क्रिकेटच्या युगात सुधारणेसाठी इंग्लंडने टीका सहन करायला तयार असलं पाहिजे” असं नासीर हुसैन म्हणाला. “तुम्हाला जे वाटतं, ते तुमच मत नोंदवण्याची मोकळीक नसेल किंवा तशी संस्कृती नसेल, तर ते इंग्लिश क्रिकेटसाठी घातक आहे” असं नासीर हुसैन म्हणाला.