Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वाल आणि अक्षर पटेलची चांदी, तिसऱ्या टी 20 आधी गूड न्यूज
Yashasvi Jaiswal Team India | काही महिन्यांपूर्वी टीम इंडियात एन्ट्री मिळवणाऱ्या यशस्वी जयस्वालने इतिहास रचला आहे. यशस्वी त्याच्या नावाप्रमाणे यशस्वी ठरला आहे. नक्की काय केलंय त्याने जाणून घ्या.
मुंबई | टीम इंडिया अफगाणिनस्तान विरुद्ध 17 जानेवारी रोजी तिसरा आणि अंतिम टी 20 सामना खेळणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्याच्या काही तासांआधी मुंबईकर आणि युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल याला आतापर्यंतची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी मिळाली आहे. यशस्वीला मोठी लॉटरी लागली आहे. यशस्वीने आतापर्यंत करियरमधील सर्वात मोठी भरारी घेतली आहे. तसेच टीम इंडियाच्या आणखी एका ऑलराउंड खेळाडूची चांदी झाली आहे. नक्की काय झालंय, जाणून घेऊयात.
आयसीसीने नेहमीप्रमाणे बुधवारी टी 20 रँकिंग जाहीर केली आहे. या टी 20 रँकिंगमध्ये यशस्वी जयस्वाल आणि अक्षर पटेल या दोघांना जबर फायदा झालाय. या दोघांनी अफगाणिस्तान विरुद्ध सुरु असलेल्या टी 20 मालिकेत केलेल्या कामगिरीचं रिटर्न गिफ्ट मिळालंय. अक्षर आणि यशस्वी या दोघांनी करियरमधील सर्वोत्तम कामिगरी करत रँकिंगमध्ये गरुडझेप घेतली आहे. यशस्वीने थेट 7 स्थानांची झेप घेतली आहे. यशस्वी अशा प्रकारे सहाव्या स्थानावर पोहचला आहे. यशस्वीच्या नावावर 739 रेटिंग आहेत.
यशस्वीला पहिल्या टी 20 सामन्यात दुखापतीमुळे खेळता आलं नाही. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातून यशस्वीने कमबॅक केलं. यशस्वीने दुसऱ्या टी 20 सामन्यात अफगाणिस्तान विरुद्ध 68 धावांची खेळी केली. टीम इंडियाला यशस्वीच्या या खेळीमुळे दुसरा सामना जिंकता आला. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली.
पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम याला एका स्थानाचा फायदा झालाय. बाबरने पाचव्या स्थानावरुन चौथ्या स्थानी झेप घेतलीय. बाबरने न्यूझीलंड विरुद्ध सुरु असलेल्या 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेतील पहिल्या 3 सामन्यात सलग अर्धशतकं ठोकलीत. तर बाबरमुळे एडन मारक्रम याची पाचव्या स्थानी घसरण झाली आहे.
आयसीसी टी 20 रँकिंगमध्ये जयस्वाल ‘यशस्वी’
Sri Lanka and India stars command the spotlight in a host of changes in the latest ICC Men’s Player Rankings 📝
Read on 👇 https://t.co/kKr1r8VOm5
— ICC (@ICC) January 17, 2024
दुसऱ्या बाजूला अक्षर पटेल थेट 12 स्थानांची झेप घेत थेट 5 व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. अक्षरने अफगाणिस्तान विरुद्ध पहिल्या 2 सामन्यात 2-2 विकेट्स घेतल्या. अक्षरने टीम इंडियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.