AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RR vs GT : वैभव सूर्यवंशीचा मनाचा मोठेपणा, ऐतिहासिक शतकी खेळीनंतर यशस्वीला दिलं श्रेय, म्हणाला…

Vaibhav Suryavanshi Post Match RR vs GT : राजस्थानच्या 14 वर्षीय युवा वैभव सूर्यवंशी याने गुजरात विरुद्ध ऐतिहासिक शतकी खेळी केली. राजस्थानला या खेळीच्या जोरावर गुजरातवर सहज विजय मिळवता आला. वैभवने या विजयानंतर काय म्हटलं? जाणून घ्या.

RR vs GT : वैभव सूर्यवंशीचा मनाचा मोठेपणा, ऐतिहासिक शतकी खेळीनंतर यशस्वीला दिलं श्रेय, म्हणाला...
Vaibhav Suryavanshi Post Match RR vs GTImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 29, 2025 | 12:56 AM

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 47 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने होते. उभयसंघातील सामन्याचं आयोजन हे जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. राजस्थान रॉयल्सने घरच्या मैदानात गुजरात टायटन्सवर 8 विकेट्सने अफलातून विजय मिळवला. वैभव सूर्यवंशी हा 14 वर्षांचा युवा खेळाडू राजस्थानच्या या विजयाचा शिल्पकार ठरला. वैभवने 210 धावांचा पाठलाग करताना ऐतिहासिक शतक झळकावलं.

वैभवने 38 चेंडूत 11 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 101 धावांची भागीदारी केली. वैभवच्या या शतकामुळे राजस्थानचा विजय निश्चित झाला. वैभव आणि यशस्वी या जोडीने 166 धावांची सलामी भागादारी केली. वैभव आऊट झाल्यानंतर नितीश राणा याने 4 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यानंतर यशस्वी आणि कर्णधार रियान पराग या दोघांनी राजस्थानला विजयापर्यंत पोहचवलं. यशस्वीने 70 आणि रियानने 32 धावांची नाबाद खेळी केली. वैभवने राजस्थानच्या विजयानंतर आणि ऐतिहासिक खेळीनंतर संवाद साधला.

वैभव सूर्यवंशी याने काय म्हटलं?

प्रेझेंटटेर मुरली कार्तिक यांनी राजस्थानच्या विजयानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान वैभवसह संवाद साधला. वैभवने या दरम्यान अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. तसंच त्याला या खेळीबाबत काय वाटलं? हे देखील वैभवने सांगितलं. “ही खूप चांगली भावना आहे. आयपीएल स्पर्धेतील हे माझं पहिले शतक आहे. ही माझी तिसरी इनिंग होती. स्पर्धेपूर्वी मी खूप सराव केला. त्या सरावाचा निकाल येथे दिसून आला आहे”, असं वैभवने म्हटलं.

हे सुद्धा वाचा

तु इतक्या दिग्गज आणि अनुभवी गोलंदाजांसमोर खेळत होतास. त्यांच्यासमोर कसं खेळायचं? त्यांचा सामना कसा करायचा? याचं तुला दडपण नव्हतं का? असा प्रश्न कार्तिकने केला. यावर वैभवने म्हटलं की, “मी फक्त बॉल पाहत होतो आणि खेळत होतो.”

वैभवने यशस्वी जयस्वालबाबत काय म्हटलं?

वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी विजयी धावांचा पाठलाग करताना 166 धावांची सलामी भागीदारी केली. या जोडीने केलेल्या भागीदारीमुळे राजस्थानचा विजय सोपा झाला. वैभवने शतकी खेळीबाबत बोलताना यशस्वी जयस्वाल याचाही उल्लेख केला. यशस्वी मला दुसऱ्या बाजूने मार्गदर्शन करत होता. मला त्याच्यासोबत बॅटिंग करायला आवडते”, असं म्हणत वैभवने त्याच्या या खेळीचं काही अंशी श्रेय यशस्वीला दिलं आणि मनाचा मोठेपणा दाखवून दिला.

ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान.
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?.
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट.
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज.
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन.
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही.
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्...
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्....
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?.
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय.
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब.