T20 WC: ‘तुमच्याकडे जगातील सर्वोत्तम गाडी आहे, पण….’ भारताच्या टी 20 वर्ल्ड कप टीमवरुन ब्रेट ली चा टोमणा
T20 WC: ब्रेट ली ने टीम इंडियाच्या वर्ल्ड कप टीमबद्दल असं का म्हटलं? कुठला बॉलर त्याला टीममध्ये हवाय?
मुंबई: टीम इंडियाच्या टी 20 वर्ल्ड कप (T20 World cup) टीमबद्दल अजूनही चर्चा सुरु आहेत. अनेक दिग्गज क्रिकेटपटुंनी या टीमबद्दल आपआपली मत मांडली आहेत. रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह (Jasprit bumrah) या गोलंदाजांशिवाय टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कपमध्ये उतरणार आहे. हे दोन खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. आता दीपक चाहरची (Deepak chahar) त्यात भर पडली आहे. दीपक चाहर जसप्रीत बुमराहची जागा घेण्यासाठी प्रबळ दावेदार होता. पण दीपक चाहरही दुखापतीमुळे वर्ल्ड कपला मुकणार आहे.
अजून दोन पर्याय कुठले?
भारतीय टीम मॅनेजमेंटकडे आता निवडक पर्याय उपलब्ध आहेत. यात मोहम्मद शमीची बुमराहच्या जागी निवड निश्चित मानली जातेय. उमरान मलिक आणि मोहम्मद सिराज या दोन वेगवान गोलंदाजांचा सुद्धा पर्याय उपलब्ध आहे.
त्याने मालिकावीराचा पुरस्कार मिळवला
उमरान मलिक आणि मोहम्मद सिराज हे दोघे सुद्धा नेट बॉलर म्हणून ऑस्ट्रेलियाला जाणार आहेत. उमरान अजूनही अन्य वेगवान बॉलर्सच्या तुलनेत थोडा कच्चा आहे. मोहम्मद सिराजने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये मालिकावीराचा पुरस्कार मिळवला.
22 वर्षाचा हा युवा वेगवान गोलंदाज टीममध्ये हवा
या दोघांपैकी एकाला संधी द्यायची असल्यास, ब्रेट ली ने उमरान मलिकच्या पारड्यात आपलं मत टाकलं. 22 वर्षाचा हा युवा वेगवान गोलंदाज टीम इंडियाच्या वर्ल्ड कप टीममध्ये हवा, असं ब्रेट ली च आहे. ब्रेट ली ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज आहे.
तुमच्याकडे जगातील सर्वोत्तम गाडी आहे, पण….
“उमरान मलिक प्रति तास 150 किमी वेगाने गोलंदाजी करतो. तुमच्याकडे जगातील सर्वोत्तम गाडी आहे. पण तुम्ही ती गॅरेजमध्ये ठेवणार असाल, तर ती कार तुमच्याकडे असून काय उपयोग? उमरान मलिकचा वर्ल्ड कपसाठी टीममध्ये समावेश करायला पाहिजे होता” असं ली खलीज टाइम्सशी बोलताना म्हणाला.
“उमरान तरुण आहे. तो कच्चा आहे. पण 150 किमी प्रतितास वेगान बॉलिंग करतो. त्यामुळे त्याला टीममध्ये स्थान द्या. ऑस्ट्रेलियात आणा. 140 किमी प्रतितास आणि 150 किमी प्रतितास वेगाने बॉलिंग करणाऱ्या गोलंदाजांमध्ये फरक असतो” असं ब्रेट ली म्हणाला.