‘तुझी वेळ आलीय’, पाँटिंगच्या शब्दांनी दिला आत्मविश्वास, टीम इंडियात निवड झालेल्या खेळाडूने सांगितला किस्सा

दिल्ली कॅपिटल्स संघाचा हेड कोच म्हणून काम करताना रिकी पाँटिंगने अनेक युवा भारतीय क्रिकेटपटूंवर मेहनत घेतली.

'तुझी वेळ आलीय', पाँटिंगच्या शब्दांनी दिला आत्मविश्वास, टीम इंडियात निवड झालेल्या खेळाडूने सांगितला किस्सा
avesh khan
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 7:00 AM

नवी दिल्ली: इंडियन प्रिमियर लीगमध्ये (IPL) ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगला (Ricky pointing) अजून दिल्ली कॅपिटल्स संघासोबत स्पर्धा जिंकण्याचा आनंद साजरा करता आलेला नाहीय. पण संघाची उत्तम बांधणी करुन जेतेपदाच्या शर्यतीत नेण्याची करामत पाँटिंगने करुन दाखवली आहे. 2020 च्या मोसमात दिल्लीच्या संघाने अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यानंतरच्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ गुणतालिकेत टॉपवर होता. पण प्लेऑफमध्ये त्यांना सलग दोन पराभव स्वीकारावे लागले. दिल्ली कॅपिटल्स संघाचा हेड कोच म्हणून काम करताना रिकी पाँटिंगने अनेक युवा भारतीय क्रिकेटपटूंवर मेहनत घेतली. वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात निवड झालेला आवेश खानही (Avesh Khan) 2018 ते 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला आहे. “पाँटिगच्या सल्ल्याने माझ्यात चैतन्य निर्माण केलं. मला मजबूत बनवलं व माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला” असं आवेश खानने सांगितलं.

आवेश खानला कशी मिळाली संधी? “कागिसो राबाडा आणि नॉर्त्जे दोघांना दुखापत झाली होती. मला संधी मिळणार, हे मला ठाऊक होतं. मला खेळवणार हे मला माहित होतं. पण मला थोडं टेन्शन होतं. त्यावेळी रिकी पाँटिंग यांनी माझ्यात चैतन्य निर्माण केलं. तुझी वेळ आलीय, जगाला दाखवून दे तु किती उत्तम खेळू शकतोस. तुझ्यामधल्या टॅलेंटची आम्हाला कल्पना आहे. आता तेच टॅलेंट जगाला बघू दे. त्या शब्दांनी माझ्यात चैतन्य निर्माण केलं. अचानक माझ्यामध्ये बळ आलं, आत्मविश्वास निर्माण झाला” असे आवेश खानने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं.

आवेशने IPL चा मोसम गाजवला आवेशने 2021 चा आयपीएलचा मोसम आपल्या गोलंदाजीने गाजवला. त्याने 16 सामन्यात 24 विकेट घेतल्या. आरसीबीच्या हर्षल पटेल पाठोपाठ सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर होता. हर्षल पटेलने सर्वाधिक 32 विकेट घेतल्या. आयपीएलमधल्या या यशामुळे आवेश खानला 2021 च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये नेट गोलंदाज म्हणून संधी मिळाली. आवेश खानची आता वेस्ट इंडिज विरुद्धच्या आगामी वनडे आणि टी-20 संघात निवड झाली आहे.

संबंधित बातम्या: ‘इरफान भाई मला नेहमी सांगायचे, अपना टाइम आयेगा’, टीम इंडियात निवड झालेला ‘तो’ 26 वर्षाचा मुलगा झाला भावूक IPL 2022: शुभमन गिलला गमावण्याचा KKR च्या हेड कोचनी आयुष्याशी जोडला संबंध म्हणाले…. Virat kohli: ‘त्या’ दिग्गज ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने थोपटली विराटची पाठ, सहजासहजी त्यांच्या तोंडून कौतुकाचे शब्द निघत नाहीत

‘Your time has come’ India youngster Avesh khan reveals how Ponting made him ‘strong and confident’

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.