Happy Birthday Yuvraj : अलिशान आयुष्य, जबरदस्त कार कलेक्शन; कॅन्सरला नमवणाऱ्या युवराज सिंगबद्दल जाणून घ्या

Happy Birthday Yuvraj: आज टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगचा 43 वा वाढदिवस आहे. युवराज सिंग हा भारतीय क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे. क्रिकेटव्यतिरिक्त तो अनेक ठिकाणांहून कमाई करतो. युवराजने आपल्या कारकिर्दीत एकूण 3 आयसीसी ट्रॉफी जिंकल्या.

Happy Birthday Yuvraj : अलिशान आयुष्य, जबरदस्त कार कलेक्शन; कॅन्सरला नमवणाऱ्या युवराज सिंगबद्दल जाणून घ्या
युवराज सिंग
Follow us
| Updated on: Jan 03, 2025 | 3:13 PM

Happy Birthday Yuvraj : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आज आपला 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. युवराज सिंग हा भारताचा सर्वात यशस्वी अष्टपैलू खेळाडू आहे. टीम इंडियासाठी युवराजचे योगदान सर्वांनाच माहित आहे, तो प्रत्येक मोठ्या स्पर्धेत टीम इंडियासाठी मोठा मॅच विनर ठरला. 2019 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, पण आजही कमाईच्या बाबतीत तो अनेक खेळाडूंच्या पुढे आहे.

कॅन्सरविरुद्धही धाडसी लढाई

युवराज सिंग हा अशा दिग्गज क्रिकेटपटूंपैकी एक आहे जो केवळ मैदानावरील कामगिरीसाठीच नव्हे तर मैदानाबाहेरील त्याच्या शानदार जीवनशैलीसाठी देखील ओळखला जातो. क्रिकेटमधील यशाबरोबरच युवराजने कॅन्सरविरुद्धही धाडसी लढाई लढली आणि त्यानंतर तो मैदानात परतला.

संपत्ती जवळपास 291 कोटी रुपये

युवराजने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत भरपूर पैसे कमावले आणि आता तो अनेक प्रसिद्ध ब्रँड्सशी जोडला गेला आहे. युवराज सिंग हा भारतीय क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युवराजची एकूण संपत्ती जवळपास 291 कोटी रुपये आहे.

त्यांची कमाई जाहिरात, मालमत्ता भाडे आणि गुंतवणुकीसह विविध स्त्रोतांमधून येते. युवराजने अनेक बड्या कंपन्यांमध्ये जाहिरातीत काम केले, ज्यामुळे त्याला मोठे पैसे मिळतात.

रिपोर्ट्सनुसार, युवराज त्याच्या ब्रँड एंडोर्समेंटमधून दरमहा सुमारे 1 कोटी रुपये कमावतो. रिअल इस्टेटमध्येही त्यांनी गुंतवणूक केली आहे. त्यांच्याकडे अनेक फिटनेस सेंटर आणि स्पोर्ट्स सेंटरही आहेत, ज्यातून ते मोठी कमाई करत आहेत.

युवराज सिंग जगतोय आलिशान आयुष्य

मुळचा चंदीगडचा रहिवासी असलेल्या युवराजकडे मुंबईतील दोन आलिशान अपार्टमेंटसह अनेक आलिशान मालमत्ता आहेत. वरळीतील लक्झरी रेसिडेन्शियल टॉवर ओंकार 1973 मध्ये दोन अपार्टमेंट खरेदी करण्यासाठी युवराज सिंगने 2013 मध्ये 64 कोटी रुपये खर्च केले होते. याशिवाय चंदीगडमध्ये युवराजची दोन मजली हवेलीही आहे. तर दुसरीकडे युवीचं गोव्यातही घर आहे, जे मोरजीच्या टेकडीवर आहे. ते हे घर भाड्यानेही देतात, ज्यातून ते कमावतात.

कार कलेक्शन

युवराज सिंगकडेही जबरदस्त कार कलेक्शन आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याच्या कलेक्शनमध्ये बीएमडब्ल्यू एम 5 ई 60, बीएमडब्ल्यू एक्स 6 एम, ऑडी क्यू 5, लोम्बिरिगानी मर्सिएलागो, बेंटले कॉन्टिनेंटल जीटी यांचा समावेश आहे.

युवराज सिंगची शानदार कारकीर्द

युवराज सिंगचा जन्म 12 डिसेंबर 1981 रोजी झाला. पंजाबची राजधानी चंदीगडचा रहिवासी असलेल्या युवराज सिंगने वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी पदार्पण केले. युवराज सिंगने भारताकडून 304 वनडे, 58 टी-20 आंतरराष्ट्रीय आणि 40 कसोटी सामने खेळले आहेत. याशिवाय त्याने 132 आयपीएल सामनेही खेळले आहेत.

वनडेत त्याने 14 शतके आणि 52 अर्धशतकांसह 8,701 धावा केल्या आहेत आणि 111 विकेट्सही घेतल्या आहेत. कसोटीत त्याने 1900 आणि 9 विकेट्स घेतल्या होत्या. तर टी-20 मध्ये त्याने 1177 धावा केल्या आणि 28 विकेट्स घेतल्या. 2002 चॅम्पियन्स ट्रॉफी, 2007 टी-20 विश्वचषक आणि 2011 वनडे विश्वचषकाच्या विजेत्या संघाचाही तो भाग होता.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.