T20I World Cup 2024 मध्ये रोहितने कॅप्टन्सी करायला पाहिजे? युवराज म्हणाला..
Icc World Cup 2024 | टी 20 वर्ल्ड कप 2024 ला 1 जूनपासून सुरुवात होत आहे. या टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व कुणी करायला हवं? याबाबत सिक्सर किंग युवराज सिंग काय म्हणालाय?
मुंबई | टीम इंडिया नववर्षातील पहिलीच आणि टी 20 मालिका अफगाणिस्तान विरुद्ध खेळत आहे. एकूण 3 सामन्यांची ही मालिका आहे. दोन्ही संघांमध्ये ही पहिलीच टी 20 मालिका आहे. तसेच टीम इंडियाची आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 आधीची अखेरची टी 20 सीरिज आहे. त्यामुळे या सीरिजला फार महत्त्व आहे. आता टी 20 चा नियमित कर्णधार हार्दिक पंड्या हा दुखापतग्रस्त आहे. सूर्यकुमार यादव याची देखील दुखापतीने विकेट काढली आहे.
दोन्ही खेळाडू हे दुखापतग्रस्त आहेत. अशात 14 महिन्यांनी विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांची टीम इंडियात एन्ट्री झाली आहे. रोहित अफगाणिस्तान विरुद्ध नेतृत्व करत आहे. त्यामुळे आगामी टी 20 वर्ल्ड कपसाठीही रोहितनेच नेतृत्व करावं, अशी इच्छा क्रिकेट चाहत्यांची आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्ये कॅप्टन कोण असावं यावरुन मतमतांतर आहेत. टीम इंडियाचा माजी अष्टपैलू युवराज सिंह याला याबाबत विचारणा करण्यात आली, यावर युवराज सिंहने काय उत्तर दिलं, ते जाणून घेऊयात.
युवराजसाठी कॅप्टन कोण?
अशा खेळाडूला कर्णधार करायवा हवं जो परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात सक्षम असेल. तसेच घेतलेला निर्णय चुकीचा ठरला, तर तशा स्थितीवरही नियंत्रण मिळवण्याची क्षमता त्यात असायला हवी.”, असं युवराज म्हणाला.
रोहितबाबत युवराज काय म्हणाला?
Yuvraj Singh said, “Rohit Sharma is a great captain. With 5 IPL trophies and leading us into finals, he stands as one of the great captains in IPL and India.” 🏆🇮🇳🏏 video credit >RevSportz#YuvrajSingh #RohitSharma #TeamIndia #INDvAFG pic.twitter.com/Vw7MiFXxZv
— Sahib Singh (@singh28915) January 13, 2024
“रोहित शर्मा हा एक चांगला कॅप्टन आहे, याबाबत अनेक गोष्टी साक्ष आहेत. रोहितने मुंबई इंडियन्सला 5 वेळा आयपीएल चॅम्पियन केलंय. तसेच रोहितनेच आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहचवलं.”, असंही युवराजने नमूद केलं. युवराजच्या या विधानावरुन स्पष्ट आहे की त्याला टी 20 वर्ल्ड कपसाठी कॅप्टन म्हणून रोहितच हवा आहे. तसेच यावरुन आणखी एक बाब स्पष्ट होते की, हार्दिकला आपल्या नेतृत्वाने युवराजला प्रभावित करता आलेलं नाही.
दरम्यान टी 20 वर्ल्ड कपचं आयोजन हे 1 ते 29 जून दरम्यान अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये करण्यात आलं आहे. एकूण 20 संघांमध्ये 29 दिवस हा थरार रंगणार आहे. टीम इंडियासह ए गुपमध्ये एकूण 5 संघ आहेत, यामध्ये पाकिस्तानचा समावेश आहे. टीम इंडिया आपला पहिला सामना हा 5 जून रोजी आयर्लंड विरुद्ध खेळणार आहे. तर अखेरचा सामना हा 15 जूनला कॅनेडा विरुद्ध होणार आहे. तिसरा सामना 12 जून रोजी यूएसए विरुद्ध पार पडेल. तर 9 जूनला या वर्ल्ड कपमधील सर्वात मोठा सामना होणार आहे. या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी टीम इंडिया-विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत.