Yuvraj Singh: युवराजच्या पुत्तरचं नाव “ओरियन”! हेच नाव का? त्यामागचं खास कारण जाणून घ्या…
भारतीय फलंदाज युवराज सिंग आणि त्याची पत्नी हेजल कीच यांनी या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीत आपल्या मुलाचे स्वागत केले आणि आता अधिकृतपणे आपल्या मुलाचे नाव ठेवले आहे. फादर्स डेच्या निमित्ताने युवराज सिंगने ट्विटरवर जाऊन आपल्या लहान मुलाला 'ओरियन कीच सिंग' असं संबोधलं जाणार असल्याचं जाहीर केलं.
युवराज सिंग (Yuvraj Singh) आणि हेजल कीच यांनी अखेर ओरियन कीच सिंग (Orion Keech Singh) या आपल्या लहान मुलाचे नाव जाहीर केले आहे. पालक म्हणून युवराज सिंगने एक नवी सुरुवात केलीये. आपल्या या नव्या पर्वाला सुरुवात करताना युवराजने आपल्या मुलाचा फोटो इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केला आहे. युवराज आणि हेझल यांनी आपल्या मुलाला ओरियन हे नाव दिले आहे, जे दोघांच्याही आडनावांचे मिश्रण आहे. आपल्या मुलाचा फोटो आज रविवारी सोशल मीडियावर त्याने चाहत्यांसोबत शेअर केलाय आणि खऱ्या अर्थाने फादर्स डे साजरा केलाय. भारतीय फलंदाज युवराज सिंग आणि त्याची पत्नी हेजल कीच यांनी या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीत आपल्या मुलाचे स्वागत केले आणि आता अधिकृतपणे आपल्या मुलाचे नाव ठेवले आहे. फादर्स डेच्या निमित्ताने युवराज सिंगने ट्विटरवर जाऊन आपल्या लहान मुलाला ‘ओरियन कीच सिंग’ असं संबोधलं जाणार असल्याचं जाहीर केलं…
Welcome to the world ????? ????? ????? ❤️. Mummy and Daddy love their little “puttar”. Your eyes twinkle with every smile just as your name is written amongst the stars ✨ #HappyFathersDay @hazelkeech pic.twitter.com/a3ozeX7gtS
हे सुद्धा वाचा— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) June 19, 2022
ओरियन कीच सिंगचा अर्थ काय आहे?
ओरियन हे एक असामान्य नाव आहे ज्याचा उगम ग्रीक पुराणकथांमध्ये झाला आहे. ओरियन हे आकाशातील एक तारकासमूह आहे जे एखाद्या शिकाऱ्यासारखं दिसते. हे तीन तेजस्वी ताऱ्यांनी बनलेलं आहे. ताऱ्यांच्या या समूहाला ग्रीक पुराणकथांतील एका पौराणिक शिकारीचे नाव देण्यात आले आहे. ग्रीक पुराणकथेत ओरियन हा शिकारी होता. त्याचा जन्म आणि मृत्यू हे दोन्ही अनेक आख्यायिकांचे विषय आहेत. सर्वात जुन्या कथेनुसार क्रीटचा राजा मिनोस याची मुलगी पोसायडन आणि युराइल या देवतेचा तो मुलगा होता.
View this post on Instagram
ओरियन हा एक स्टार
तसेच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत युवराज सिंगने खुलासा केला की, “ओरियन हा एक स्टार तारकासमूह आहे आणि पालकांसाठी, आपले मूल हे आपले स्टार आहे. जेव्हा हेजल गर्भवती होती आणि रुग्णालयात होती, तेव्हा मी असे काही शोधत होतो जिथे हे नाव माझ्याकडे आले आणि हेझलला ते लगेच आवडले”.