Yuzvendra Chahal | कुलदीप बरोबर स्पर्धा, टीम इंडियातून स्थान गमावण्यावर अखेर युजवेंद्र चहलने सोडलं मौन

Yuzvendra Chahal | कुलदीप, अश्विन बरोबर स्पर्धा आहे, त्यावर युजवेंद्र चहल काय म्हणाला?. अक्षर पटेलला दुखापत झाली. सिलेक्टर्सनी त्याच्याजागी अश्विनची निवड केली. पण युजवेंद्र चहलचा विचार केला नाही.

Yuzvendra Chahal | कुलदीप बरोबर स्पर्धा, टीम इंडियातून स्थान गमावण्यावर अखेर युजवेंद्र चहलने सोडलं मौन
Yuzvendra Chahal - Kuldeep Yadav
Follow us
| Updated on: Oct 02, 2023 | 9:16 AM

नवी दिल्ली : ऑगस्ट महिन्यात आशिया कपसाठी 17 सदस्यीय टीमची घोषणा करण्यात आली. आशिया कपमध्ये राखीव खेळाडू कोण असतील? त्यांची नाव सुद्धा जाहीर करण्यात आली. यात एक अपेक्षित नाव नव्हतं, जे पटकन लक्षात आलं. तो खेळाडू होता, युजवेंद्र चहल. नाव नव्हतं, ती गोष्ट पटकन लक्षात आली. या संघ निवडीने हरभजन सिंग सुद्धा बुचकाळ्यात पडला. पण वर्ल्ड कप टीममध्ये चहलची निवड होईल, असं त्याला वाटलं. वर्ल्ड कपची टीम जाहीर झाली, त्यामध्ये सुद्धा चहलच नाव नव्हतं. युजवेंद्र चहलकडे सिलेक्शन कमिटीने पुन्हा एकदा दुर्लक्ष केलं. वर्ल्ड कपच्या टीममध्ये स्थान मिळालं नाही, त्यावर युजवेंद्र चहल आता व्यक्त झाला आहे. जून 2016 मध्ये युजवेंद्र चहलने टीम इंडियाकडून वनडे फॉर्मेटमध्ये डेब्यु केला. वनडेत त्याने आतापर्यंत 121 विकेट काढले आहेत. युजवेंद्र चहल टीम इंडियाच्या टी 20 आणि वनडे टीमचा सातत्याने भाग राहीला आहे. 2019 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये वेगवान गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलं. पण स्पिनर्समध्ये चहल सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. आठ सामन्यात चहलने 12 विकेट काढले. यात 4 विकेट एकदा घेतल्या.

विसडेन इंडियाशी बोलताना युजवेंद्र चहल म्हणाला की, “वर्ल्ड कप टीममध्ये निवड न होणं, हे निराशाजनक आहे. त्यावर तो हसला. करीयरमध्ये माझ्यासोबत तिसऱ्यांदा असं घडतय” “फक्त 15 प्लेयरची टीममध्ये निवड होऊ शकते, कारण हा वर्ल्ड कप आहे. इथे तुम्ही 17 ते 18 प्लेयर्सची निवड करु शकत नाहीत” असं चहल म्हणाला. “मला थोडं वाईट वाटतय. पण पुढे चालत रहायच हा माझ्या आयुष्याचा उद्देश आहे. मला आता याची सवय झालीय. असं तीन वर्ल्ड कपमध्ये झालय” असं चहलने सांगितलं. 2021 च्या आयपीएल सीजनमध्ये दमदार कामगिरी करुनही युजवेंद्र चहलची त्यावेळच्या टी 20 वर्ल्ड कप टीममध्ये निवड झाली नव्हती. 2022 च्या टी 20 वर्ल्ड कप टीममध्ये त्याची निवड झाली. पण एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. आता येत्या 5 ऑक्टोंबरपासून भारतात वनडे वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. पण यावेळी सुद्धा चहलची निवड झालेली नाही. युजवेंद्र चहलच्या जागी रवींद्र जाडेजाच्या साथीला कुलदीप यादवची निवड झालीय. कुलदीप, अश्विन बरोबरच्या स्पर्धेवर चहल काय म्हणाला?

आशिया कप स्पर्धेत अक्षर पटेलला दुखापत झाली. सिलेक्टर्सनी त्याच्याजागी अश्विनची निवड केली. मागच्या 20 महिन्यात अश्विन एकही वनडे सामना खेळलेला नाही. वॉशिंग्टन सुंदरची ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरीजसाठी निवड केली. अक्षर पटेल दुखापतीमुळे वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाहीय. त्याच्या जागी सिलेक्टर्सनी अनुभवी अश्विनला पसंती दिली. कुलदीप आणि अश्विनशी स्पर्धा होती, त्यावर सुद्धा चहल व्यक्त झाला. “सिलेक्शन मागचा विचार मी समजू शकतो. जेव्हा केव्हा संधी मिळेल, तेव्हा सर्वोत्तम कामगिरी करायची, हेच माझं उद्दिष्ट्य आहे. भारतीय टीममधील दुसऱ्या स्पिनर्सबरोबर असलेल्या स्पर्धेबद्दल मी फार विचार करत नाही. मला एक गोष्ट ठाऊक आहे, मी चांगलं प्रदर्शन केलं, तर मी खेळणार. भविष्यात कोणीतरी तुमची जागा घेणार, कधीतरी तो दिवस येणारच”

बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.