मुंबई : विराट कोहलीसह काही दमदार खेळाडून आरसीबीने रिटेन केले आहेत, तर काही दिग्गज खेळाडुंना डच्चूही दिला आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये आरसीबीतही मोठे बदल पहायला मिळणार आहे. यंदा 10 आयपीएलचे संघ मैदानात उतरणार असल्यानं आयपीएल अणखी रंगतदार होणार आहे. आरसीबी विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर यंदा नव्या कर्णधारासह मैदानात उतरणार आहे. त्यामुळे आरसीबीचा नवा कर्णधार कोण असणार आहे? याच सस्पेन्सही अजून तसाच आहे.
युझवेंद्र चहल, पडीक्कलला बाहेरचा रस्ता
आरसीबीसाठी अनेक वर्षे चांगली गोलंदाजी करणारा स्पिनर आणि विराट कोहलीचा फेवरेट मानला जाणाारा युझवेंद्र चहल याला आरसीबीने रिलीज केलं आहे. त्यामुळे आरसीबीच्या फिरकीची धुरा आता कुणाकडे जाणार हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. चहलबरोबरच पडीक्कललाही आरसीबीने रिलीज केलं आहे.
विराट कोहलीबरोबर काही खेळाडू रिटेन
आरसीबीने विराट कोहलीला रिटेन केले आहे. तसेच आणखी दोन दिग्गज खेळाडू आरसीबीने रिटेन केले आहेत, त्यात ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे. मोहम्मद सिराजकडे आरसीबीच्या वेगवान गोलंदाजीची धुरा असणार आहे.
आरसीबीला वेध पहिल्या विजेतेपदाचे
गेली कित्येक वर्षे मैदानात घाम गाळूनही आरसीबीला अजूनही विजेतेपद मिळालं नाही. त्यावरून अनेकदा विराट कोहली आणि आरसीबीचा संघ ट्रोल झाल्याचंही पहायला मिळालं आहे. त्यामुळे आता आरसीबीचा नवा संघ आणि नवा कर्णधार आरसीबीला पहिलं विजेतेपद जिंकून देईल अशी अपेक्षा आहे. आरसीबीची ही अपेक्षा किती खरी उतरते हे आयपीएल झाल्यानंतरच कळेल. दिग्गज खेळाडुंचा भरणा असूनही आरसीबी अजूनही विजेतेपदापासून दूर आहे.