IND vs SL : युझवेंद्र चहलसाठी आजचा सामना महत्त्वाचा, एका ‘षटकाराने’ करु शकतो शमीच्या विक्रमाशी बरोबरी

पहिल्या सामन्यातील दमदार विजयानंतर आज भारत श्रीलंकेसोबत दुसरा एकदिवसीय सामना खेळणार आहे. या सामन्यात फिरकीपटू युझवेंद्र चहलला एका खास विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे.

IND vs SL : युझवेंद्र चहलसाठी आजचा सामना महत्त्वाचा, एका 'षटकाराने' करु शकतो शमीच्या विक्रमाशी बरोबरी
युझवेंद्र चहल
Follow us
| Updated on: Jul 20, 2021 | 12:24 PM

कोलंबो : भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना थोड्याच वेळात सुरु होणार आहे. कोलंबोच्या के. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवल्या जाणाऱ्या सामन्यात टीम इंडिया (Team India) पुन्हा विजय मिळवून मालिकेत 2-0 ची आघाडी घेण्याच्या विचारात आहे. तर श्रीलंका  (Sri lanka) विजय मिळवून मालिका बरोबरीत आणण्यासाठी खेळताना दिसेल. पण हा सामना भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून त्याने आज एक कमाल केली तर एका मोठ्या विक्रमाला तो गवासणी घालू शकतो.

पहिल्या सामन्यात महत्त्वाचे दोन विकेट मिळवणाऱ्या चहलने आज जर 6 विकेट्स मिळवले तर तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 विकेट्सचा टप्पा पार करेल. आजचा त्याचा 56 वा सामना असल्याने याच सामन्यात त्याने ही कामगिरी केल्यास तो सर्वात जलदगतीने ही कामगिरी करणाऱ्या भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी करेल. त्यामुळे आज चहल ‘विकेट्सचा षटकार’ मारेल तर तो एकदिवसीय विकेट्सचे शतक पूर्ण करेल. चहल आतापर्यंत 55 वनडे सामने खेळला आहे ज्यात त्याने 94 विकेट्स मिळवले आहेत.

शमीच्या विक्रमाशी करु शकतो बरोबरी

भारताचा महत्त्वाचा गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) याने 56 वनडे सामन्यांत 100 विकेट्स घेत सर्वात जलदगतीने 100 एकदिवसीय विकेट्स घेणारा भारतीय ठरला आहे. दरम्यान चहलच्या नावावर आतापर्यंत 94 विकेट्स असल्याने आजच्या 56 व्या सामन्यात त्याने 6 विकेट्स घेतल्यास तो शमीच्या जलदगतीने 100 एकदिवसीय विकेट्स घेण्याच्या विक्रमाशी बरोबरी करु शकतो. शमीनंतर जसप्रीत बुमराहने 57 सामन्यात 100 विकेट घेतले आहेत.

हे ही वाचा :

India vs Sri Lanka, 2nd ODI live streaming: भारत विरुद्ध श्रीलंका, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?

IND vs SL : पहिल्या सामन्यात जे नाही घडलं ते दुसऱ्या सामन्यात होणार, श्रीलंकेच्या ‘या’ खेळाडूचे भारताला आव्हान

VIDEO : गोलंदाजी करताना कृणालचा श्रीलंकन फलंदाजाला लागला धक्का, मग केले असे काही की जिंकली सर्वांचीच मने, पाहा व्हिडीओ

(Yuzvendra chahal took Six Wickets in India vs Sri Lanka second Odi hell Equals record of fastest 100 odi wicket with Mohammed Shami)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.