ZIM vs IND Toss: झिंबाब्वेचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय, कॅप्टन शुबमन रोहितसारखाच खेळाडूंची नावं विसरला
Zimbabwe vs India, 5th T20I Toss: टीम इंडिया झिंबाब्वे विरूद्धच्या 5 सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशा फरकाने आघाडीवर आहे.
झिंबाब्वे विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील टी 20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या मालिकेत 3-1 अशा फरकाने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाला हा शेवटचा सामना जिंकून विजयी चौकार लगावण्याची संधी आहे. तर यजमान झिंबाब्वेसाठी हा प्रतिष्ठेचा सामना असणार आहे. त्यामुळे झिंबाब्वे या सामन्यात अधिक ताकदीने मैदानात उतरणार आहे. या सामन्याला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 4 वाजता टॉस झाला. झिंबाब्वेने टॉस जिंकला. कॅप्टन सिकंदर रझा याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघांनी मालिकेतील शेवटच्या सामन्यालाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. कॅप्टन सिकंदर रझा याने तेंडाई चतारा याच्या जागी ब्रँडन मावुता याचा समावेश केला आहे. तर टीम इंडियात कुणाच्या जागी कुणाचा समावेश करण्यात आला आहे? या प्रश्नाचं उत्तर देताना कॅप्टन शुबमन गिल याची रोहित शर्मासारखीच स्थिती झाली.शुबमन गिल खेळाडूंची नावं विसरला. तेव्हा प्रेझेंटेटर “हरकत नाही” असं म्हटलं, तेव्हा शुबमनही हसला. टीम इंडियात 2 बदल करण्यात आले आहेत. कॅप्टन शुबमनने ऋतुराज गायकवाड आणि खलील अहमद यांना बाहेर बसवलं आहे. तर त्यांच्या जागी प्लेइंग ईलेव्हनमध्ये रियान पराग आणि मुकेश कुमार या दोघांचा समावेश केला आहे.
विसरभोळा शुबमन गिल, खेळाडूंची नावं विसरला
Shubman didn’t remember which 2 players are not playing today’s match at toss 😂
Rohit bhai se itna inspire mat ho Gill 😭#ShubmanGill #ZIMvIND #TeamIndia
— Prateek (@prateek_295) July 14, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रियान पराग, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे आणि मुकेश कुमार.
झिम्बाब्वे प्लेइंग ईलेव्हन : सिकंदर रझा (कर्णधार), वेस्ली मधेवेरे, तादिवानाशे मारुमणी, ब्रायन बेनेट, डिओन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, फराज अक्रम, क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), ब्रँडन मावुता, रिचर्ड नगारावा आणि ब्लेसिंग मुझाराबानी.