PAK vs AUS: पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कामगिरीवर शोएब अख्तरचा भडका, हरले असते तर बरं झालं असतं, अख्तरचा राग अनावर

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कराचीमध्ये दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात पाकिस्तान पराभवाच्या सीमेवर उभा आहे. पाकिस्तानच्या या खराब कामगिरीवर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनं जोरदार टीका केली आहे. शोएब अख्तरनं पाकिस्तानी क्रिकेट संघावर काढलेल्या भडक्याची क्रीडा विश्वात चांगलीच चर्चा रंगली आहे.

PAK vs AUS: पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कामगिरीवर शोएब अख्तरचा भडका, हरले असते तर बरं झालं असतं, अख्तरचा राग अनावर
पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या कामगिरीवर शोएब अख्तर भडकला.Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 10:27 AM

मुंबई: पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (Pak vs Aus) यांच्यात कराचीमध्ये दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या (Pakistan cricket team) पराभवाच्या सीमेवर उभा आहे. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दुसऱ्या डावामध्ये 506 धावांचे लक्ष्य दिले होते. आता पाकिस्तानच्या या खराब कामगिरीवर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनं (Cricketer Shoaib Akhtar) जोरदार टीका केली आहे. शोएबनं थेट पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम याच्या नेतृत्वावरच प्रश्नांची सरबती केली आहे. तर याचवेळी त्याचे कौतुकही केले आहे. यामुळे पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला घरचा आहेर मिळालाय. एकीकडे सोशल मीडियावर पाकिस्तानी क्रिकेट संघाचे चाहते त्यांची स्तुती करताना दिसतायेत. तर दुसरीकडे शोएब अख्तर याने पाकिस्तानी संघाला फटकारल्याचं समोर आलं आहे. शोएब अख्तरने कराची आणि रावळपिंडीमधील विकेटवरून प्रश्नांची सरबती केली आहे. तुम्ही अशा विकेट खेळण्यासाठी देत असाल तर पाकिस्तानात येऊन कोणाला खेळायला आवडेल, असं शोएब म्हणालाय. यामुळे पाकिस्तानच्या संघाला घरचा आहेर तर मिळालाच, याऊलट संघाच्या कामगिरीवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पाकिस्तान पराभवाच्या सीमेवर

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियात खेळवल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीमध्ये पाकिस्तान पराभवाच्या सीमेवर उभा आहे. पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 506 धावांचे लक्ष्य दिले आहे. ऑस्ट्रेलियानेही पाकिस्तानच्या सुरूवातीच्या विकेट काढत पाक संघावर चांगलाच दबाव आणला होता. मात्र, हे सगळं असलं तरी पाकिस्तानचा माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या कामगिरीवर टीका केली आहे.

शोएबकडून प्रश्नांची सरबती

शोएब अख्तरने पाकिस्तानी संघाच्या पराभवानंतरचा एक व्हिडिओ त्याच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने पाकिस्तानी क्रिकेट संघाला टीकेला सामोरे जावे लागेल, असे स्पष्ट म्हटलं आहे. शोएब म्हणाला की, ‘तुम्ही इतकी थकलेली विकेट बनवली आहे की, ती पाहून कोणीही झोपू शकेल. अशी ही ऐतिहासिक भेट होती. मग अशी दमछाक करून काय सिद्ध करायचे होते? तुमच्याकडे शाहीन आफ्रिदीसारखे वेगवान गोलंदाज आहेत, मग तुमचे कसे विचार आहेत. माझ्या वेळेलाही असे व्हायचे.’ याचवेळी शोएब पुढे म्हणाला की, ‘तिसर्‍या कसोटीसाठी अशी खेळपट्टी बनवण्याची गरज आहे, ज्यामुळे हरलो तरी निकाल मिळेल. आपण गमावल्यास काय होईल? आपण काहीतरी शिकू, निदान काहीतरी बरोबर तरी करू. तुम्ही 500 धावा करत आहात. भारत दौऱ्यात जशी खेळपट्टी बनवली जायची. ते लोक यायचे आणि 500-500 धावा काढायचे. वीरेंद्र सेहवाग एकटा 300 धावा काढायचा. मला त्यांचे श्रेय फलंदाजांकडून घ्यायचे नाही पण तुम्ही गोलंदाजांसाठीही काहीतरी सोडा.’ असं शोएब म्हणाला

बाबर आझमचं तोंडभरुन कौतुक

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने 196 धावांची खेळी करणाऱ्या बाबर आझमचे तोंडभरुन कौतुक केले. शोएब यावेळी म्हणाला की, ‘बाबरने शानदार खेळ दाखवला. तो पाकिस्तान तो सुपरमॅन आहे, ते पाहून मुलं क्रिकेट खेळायला लागतील. त्याला द्विशतक करता आले नाही याचे मला दु:ख आहे. दरम्यान, शोएब अख्तरनं पाकिस्तानी क्रिकेट संघावर काढलेल्या भडक्याची क्रीडा विश्वात चांगलीच चर्चा रंगली आहे.

इतर बातम्या

खरेदीसाठी नागरिकांची दादर मार्केटमध्ये गर्दी

Chess Game : भारताला ऑलिम्पियाड बुद्धिबळचे यजमानपद, खेळाचं आयोजन चेन्नईत, यंदाची ऑलिम्पियाड भारतासाठी का विशेष?

देशात पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर, मात्र इंधन खरेदीत वाढ

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.