AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएलच्या उर्वरित सामन्यात MS Dhoni धमाका करेल, चेन्नईच्या खेळाडूची भविष्यवाणी

आयपीएलच्या उत्तरार्धात धोनी नक्की जबरदस्त फलंदाजी करेल, असा विश्वास दीपक चाहरने व्यक्त केला आहे. (CSK bowler deepak Chahar best of ms dhoni in ipl second half)

आयपीएलच्या उर्वरित सामन्यात MS Dhoni धमाका करेल, चेन्नईच्या खेळाडूची भविष्यवाणी
एम एस धोनी
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 2:56 PM

मुंबई : कोरोना व्हायरसच्या मैदानातील एन्ट्रीमुळे आयपीएलचं 14 वं पर्व (IPL 2021) अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलंय. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आयपीएलचे उर्वरित सामने यूएईमध्ये घेण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. येत्या 31 मे रोजी बीसीसीआयची एक महत्तपूर्ण बैठक होतीय. या बैठकीत आयपीएलच्या उर्वरित सामन्यांविषयी मोठ्या घोषणेची शक्यता आहे. अशातच चेन्नई सुपर किंग्जचा स्टार बोलर दीपक चाहरने (Deepak Chahar) एक मोठी भविष्यवाणी केलीय. आयपीएलच्या उर्वरित सामन्यात महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) धमाका करेल, असं भाकित त्याने वर्तवलं आहे. (CSK bowler deepak Chahar best of ms dhoni in ipl second half)

यंदाच्या आयपीएल मोसमामध्ये चेन्नईचा संघ जुन्या फॉर्ममध्ये दिसला. त्यामागे दीपक चाहरची महत्त्वपूर्ण कामगिरी राहिली आहे. स्पर्धा स्थगित होईपर्यंत त्याने 7 सामने खेळले. त्यामध्ये त्याने 8 विकेट्स घेतल्या. चाहरने सुरुवातीच्या सामन्यांमध्ये आपल्या संघाला पॉवरप्लेमध्येच विकेट मिळवून दिल्या.चाहरने या 08 विकेट्स 02 सामन्यात आल्या. त्याने पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 4-4 विकेट्स घेतल्या.

आयपीएलच्या 14 व्या पर्वात धोनीची खराब परफॉर्मन्स

2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या धोनीने आयपीएलच्या 14 व्या पर्वात 7 सामन्यांत बॅटिंग केली त्यामध्ये त्याने अवघ्या 37 धावा केल्या. आयपीएल 14 मध्ये धोनीच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडेल, अशी अपेक्षा त्याच्या फॅन्सना होती. मात्र असं काही झालं नाही. उलट धोनी अगदीच संथ झालेला पाहायला मिळाला.

आयपीएलच्या उत्तरार्धात धोनी धमाका करणार!

स्पोर्ट्सकीडाशी बोलताना दीपक चाहर म्हणाला, “एक फलंदाज 15-20 वर्षे एकसारख्याच अंदाजात फलंदाजी करु शकत नाही. जर मोठ्या स्पर्धेअगोदर कोणत्याही फलंदाजाने नियमित क्रिकेट खेळलेलं नसेल तर आयपीएलसारख्या बड्या टूर्नामेंटमध्ये येऊन मोठ्या खेळी करणं सोपं नसतं.”

“फलंदाजाला सेट होण्यासाठी थोडा वेळ लागतच असतो. धोनीने नेहमीच फिनिशरची भूमिका यशस्वीपणे निभावली. परंतु जेव्हा आपण नियमित क्रिकेट खेळत नाही तेव्हा मोठ्या स्पर्धेत मोठ्या खेळी करणं, वाटतं तेवढं सोपं नसतं. 2018 आणि 2019 च्या हंगामातही धोनीने आयपीएलच्या पर्वात सावकाश सुरुवात केली पण हंगाम जसजसा पुढे सरकला तसतसा तो लयीत आला. आता स्थगित झालेल्या आयपीएलच्या उत्तरार्धात धोनी नक्की जबरदस्त फलंदाजी करेल”, असा विश्वास दीपक चाहरने व्यक्त केला आहे.

(CSK bowler deepak Chahar best of ms dhoni in ipl second half)

हे ही वाचा :

सुनील शेट्टीची लेक KL Rahul च्या फिटनेसवर फिदा, फोटोवर कमेंट करुन म्हणाली…

Photo : ‘अरे बाबांनो मी तिचा मालक नाहीय’, इरफान खान बायकोच्या त्या फोटोवरुन ट्रोलर्सवर भडकला

Video : है तय्यार हम! भारतीय क्रिकेटपटूंचा सराव जोमात सुरु

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.