CSK VS RCB, IPL 2021 Match Prediction: धोनीची चेन्नई विजयी ‘चौकार’ मारणार की विराटची बंगळुरु ‘पंच’ मारणार?

विराटचा विजयी रथ आज धोनीची चेन्नई रोखू शकते. तसंच गुणतालिकेत क्रमांक एकवर असलेल्या बंगळुरुला खालीही खेचू शकते. (CSK VS RCB, IPL 2021 Match Prediction Previous Match Stats 25 April in marathi)

CSK VS RCB, IPL 2021 Match Prediction: धोनीची चेन्नई विजयी ‘चौकार’ मारणार की विराटची बंगळुरु ‘पंच’ मारणार?
RCB vs CSK
Follow us
| Updated on: Apr 25, 2021 | 12:51 PM

मुंबई :  आयपीएलच्या 14 व्या पर्वातील (IPL 2021) दोन बलाढ्य संघ आज एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. एकीकडे एम एस धोनीच्या (MS Choni) नेतृत्वाखालील चेन्नई (Chennai Super Kings) तर दुसरीकडे विराटच्या (Virat kohli) नेतृत्वाखालील बंगळुरु (Royals Challengers Banglore) संघ एकमेकांना टक्कर देतील. दोन्ही संघांमधील आजचा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. (CSK VS RCB, IPL 2021 Match Prediction Previous Match Stats 25 April in marathi)

बंगळुरुचा विजयी रथ, चेन्नईचेही सलग तीन विजय

या हंगामात विराट कोहलीची टीम अद्याप हरलेली नाही. यापूर्वी बंगळुरुने खेळलेले सर्वच्या सर्व म्हणजे 4 सामने जिंकले आहेत. त्याच बळावर बंगळुरुचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. दुसरीकडे धोनीच्या सीएसकेनेही विजयाची हॅटट्रिक केली आहे. पहिल्या 4 सामन्यात फक्त पहिला सामना गमावल्यानंतर पुढील तीन सामने चेन्नईने जिंकले आहेत.

धोनी असो वा विराट, दोघेही विजयाच्या रुळावर धावत आहेत. पण आज कुणाची तरी एक टीम हरणार आहे. एकतर धोनी विजयी चौकार ठोकू शकेल किंवा विराट कोहलीच्या विजयी मोहिमेतील पाचवा विजय आज विराट नोंद करेल.

बंगळुरु-चेन्नईची आकडेवारी काय सांगते?

पहिल्या 4 सामन्यात आरसीबीबरोबर जे झालं नाही ते आज होऊ शकतं, एवढं चेन्नईचं पारडं आकडेवारीवर नजर टाकल्यास जड आहे. म्हणजेच आजच्या सामन्यात चेन्नई बंगळुरुचा पराभव करेल, असं आकडेवारी सांगते.

विराटचा विजयी रथ चेन्नई रोखणार का?

विराटचा विजयी रथ आज धोनीची चेन्नई रोखू शकते. तसंच गुणतालिकेत क्रमांक एकवर असलेल्या बंगळुरुला खालीही खेचू शकते. आयपीएलच्या पीचवर 28 व्या वेळी दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. यापूर्वी झालेल्या 27 सामन्यांमध्ये सीएसकेने 17 वेळा विजय मिळविला आहे, तर आरसीबीला केवळ 9 सामन्यांमध्ये विजय मिळविण्यात यश आले आहे. दोन्ही संघांमधील विजयाच्या या फरकामुळे आजच्या सामन्यात चेन्नईचं पारडं जड असल्याचं दिसून येत आहे. परंतु अशाही परिस्थितीत विराटची टीम फॉर्मात आहे. गेले 4 सामने बंगळुरु उत्तम खेळला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात बंगळुरुला हरवणं चेन्नईसाठी मोठं आव्हान असणार आहे.

(CSK VS RCB, IPL 2021 Match Prediction Previous Match Stats 25 April in marathi)

हे ही वाचा :

RCB vs CSK, IPL 2021 Live Streaming : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, सामना कधी, कुठे, केव्हा?

Video : ‘उडता चेतन’, हवेत सूर मारत अविश्वसनीय कॅच ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा!

IPL 2021 : ‘या’ गोष्टीत मोहम्मद सिराज बुमराहच्याही ‘एक पाऊल पुढे!’, आशिष नेहराचं मोठं वक्तव्य

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.