AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डेव्हिड वार्नरची इन्स्टाग्राम पोस्ट, टीम इंडियासह मोहम्मद सिराजची मागितली माफी

डेव्हिड वार्नरनं तिसऱ्या सामन्यात भारतीय खेळाडूंवर झालेल्या वर्णद्वेषी टीकेबद्दल माफी मागितली आहे. (David Warner Team India)

डेव्हिड वार्नरची इन्स्टाग्राम पोस्ट, टीम इंडियासह मोहम्मद सिराजची मागितली माफी
मोहम्मद सिराज, डेव्हिड वॉर्नर
Follow us
| Updated on: Jan 12, 2021 | 3:40 PM

सिडनी: आस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज डेव्हिड वार्नरनं तिसऱ्या सामन्यात भारतीय खेळाडूंवर झालेल्या वर्णद्वेषी टीकेबद्दल माफी मागितली आहे. डेव्हिड वार्नरनं विशेष करुन मोहम्मद सिराजला सॉरी म्हटलं आहे. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियातील तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये वर्णद्वेषी टिपणी झाली होती. तिसऱ्या सामन्यादरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी भारतीय खेळाडू मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह दोघांवर काही ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी वर्णद्वेषी टिपणी केली होती. याप्रकरणी डेव्हिड वॉर्नरनं इन्स्टाग्राम पोस्ट लिहून माफी मागितली आहे. (David Warner says sorry to Team India and Mohammad Siraj)

डेव्हिड वॉर्नरची इन्स्टाग्राम पोस्ट

डेव्हिड वॉर्नरनं तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये प्रेक्षकांकडून घडलेल्या प्रकरणावर माफी मागितली आहे. इन्स्टाग्राम पोस्ट लिहून टीम इंडियाची माफी मागताना मोहम्मद सिराजची देखील माफी मागत असल्याचं डेव्हिड वार्नर म्हणाला. क्रिकेटमध्ये वर्णद्वेषी टीकेला कोणत्याही प्रकारचं स्थान नाही. ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी अशा प्रकारचं कृत्य करु नये, असं आवाहन डेव्हिड वार्नर यानं केले आहे.

ऑस्ट्रेलियन कॅप्टनकडूनही माफी

ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कॅप्टन टिम पेन यांनंदेखील प्रेक्षकांकडून करण्यात आलेल्या वर्णद्वेषी टिपणीबद्दल माफी मागितली होती. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार अंजिक्य रहाणे यानं देखील या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली होती.

कप्तान रहाणेने सामना रोखला

जसप्रीत बुमराह तिसऱ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी (Jasprit Bumrah) दुसऱ्या सत्रातील शेवटचं षटक टाकण्यास सुरुवात करत होता. त्यादरम्यान सिराज सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी सिराजच्या मागे स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांनी सिराजवर कमेंट्स करणं सरु केलं. तेव्हा कप्तान रहाणेने बुमराहला गोलंदाजी करण्यापासून रोखले. त्यानंतर रहाणेने सिराजशी बातचित केली आणि थेट पंचांना गाठून त्यांच्याकडे तक्रार केली. यादरम्यान संपूर्ण भारतीय संघ खेळपट्टीजवळ एकत्र जमला. त्यानंतर पंचांनी आणि पोलिसांनी स्टँडमध्ये जाऊन संबंधित प्रेक्षकांना स्टेडियमधून बाहेर जाण्यास सांगितले. यादरम्यान भारतीय टीमच्या ड्रेसिंग रुममध्येदेखील नाराजी दिसत होती. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीदेखील टीम सिक्युरिटीशी बातचित केली.

संबंधित बातम्या:

मोहम्मद शमी, उमेश यादव, केएल राहुल आणि रवींद्र जाडेजा जायबंदी, कसोटी की दुखापतीची मालिका?

Sydney Test : भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेषी टीका, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा माफीनामा

(David Warner says sorry to Team India and Mohammad Siraj)

बलुच आर्मीकडून पाकिस्तानी लष्करावर पुन्हा हल्ला, 14 सैनिकांना केलं ठार
बलुच आर्मीकडून पाकिस्तानी लष्करावर पुन्हा हल्ला, 14 सैनिकांना केलं ठार.
एकाचवेळी 13 ठिकाणी ईडीचे छापे; नालासोपारात खळबळ
एकाचवेळी 13 ठिकाणी ईडीचे छापे; नालासोपारात खळबळ.
पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO
पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO.
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती.
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?.
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा...
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा....
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?.
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार.
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला.
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य.