Vinod Kambli : सचिन तेंडुलकरला विनोद कांबळीपेक्षा पेन्शनमध्ये किती जास्त रक्कम मिळते?

Vinod Kambli : सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीच्या क्रिकेटच्या अनुभवामध्ये जितकं अंतर आहे, तितकच त्यांना मिळणाऱ्या पेन्शनच्या रक्कमेमध्ये सुद्धा फरक आहे. सचिन तेंडुलकरला आणि विनोद कांबळीला दर महिन्याला BCCI कडून किती पेन्शन मिळते? हे तुम्हाला ठाऊक आहे का?. दोघांना मिळणाऱ्या पेन्शनच्या रक्कमेमध्ये किती अंतर आहे? जाणून घ्या.

Vinod Kambli : सचिन तेंडुलकरला विनोद कांबळीपेक्षा पेन्शनमध्ये किती जास्त रक्कम मिळते?
Vindo Kambli-Sachin Tendulkar
Follow us
| Updated on: Dec 10, 2024 | 11:49 AM

90 च्या दशकात मुंबई क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीची जोडी हिट होती. दोघांच शिक्षण एकत्र झालं, दोघे एकत्र खेळले. टीम इंडियाकडून दोघे एकत्र खेळले. त्यावेळी दोघे करिअरमध्ये उंची गाठवणार असं जाणकरांना वाटत होतं. पण सुरुवात जशी झाली, करिअरचा शेवट तसा नव्हता. सचिन या शर्यतीत खूप पुढे निघून गेला. 21 व्या शतकात पाऊल ठेवण्याआधीच विनोद कांबळीची गाडी अडखळली. सचिन तेंडुलकरनंतर एक वर्षाने विनोद कांबळीने डेब्यु केला. कांबळी 2000 साली शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. सचिनने 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. रिटायरमेंटनंतर दोघांना सचिन आणि कांबळीला BCCI कडून पेंशन मिळते. दोघांना मिळणाऱ्या पेंशनच्या रक्कमेमध्ये सुद्धा फरक आहे.

सचिन तेंडुलकरला विनोद कांबळीच्या तुलनेत जास्त पेंशनची रक्कम मिळते. पण प्रश्न हा आहे की, किती जास्त?. सचिन आणि कांबळीला मिळणाऱ्या पेंशनच्या रक्कमेमध्ये किती फरक आहे. BCCI कडून दर महिन्याला दोघांना जी पेंशन मिळते, त्यात 20 हजार रुपयांचा फरक आहे. सरळ शब्दात सचिनला कांबळीपेक्षा दरमहिन्याला 20 हजार रुपये जास्त मिळतात.

सचिनकडे पेंशनशिवाय किती कोटीची संपत्ती?

एका रिपोर्ट्नुसार सचिन तेंडुलकरला दर महिन्याला BCCI कडून पेंशनची जी रक्कम मिळते, ती 50 हजार रुपये आहे. विनोद कांबळीला दर महिन्याला बीसीसीआयलकडून 30 हजार रुपये मिळतात. सध्या कांबळीची स्थिती पाहिल्यास बीसीसीआयकडून मिळणारी ही रक्कम कांबळीसाठी खूप मोठी आहे. कारण तेच त्याच्या उत्पन्नाच साधन आहे. सचिन तेंडुलकर पेंशनशिवाय 1400 कोटीच्या संपत्तीचा मालक सुद्धा आहे.

सचिन तेंडुलकरच्या एकूण धावा किती?

भारतीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्यात मोठा फरक आहे. विनोद कांबळी फक्त 9 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे. तेच सचिन तेंडुलकर दोन दशकापेक्षा जास्त काळ क्रिकेट खेळला. विनोद कांबळी भारतासाठी 17 टेस्ट आणि 104 वनडे सामने खेळला. त्यात त्याने 3500 पेक्षा जास्त धावा केल्या. सचिन तेंडुलकर भारतासाठी 200 टेस्ट, 463 वनडे आणि 1 टी 20 सामना खेळला. सचिनने एकूण मिळून 34357 धावा केल्या. यात 100 सेंच्युरी आहेत. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीच्या क्रिकेटमध्ये जितकं अंतर आहे, तितकच ते त्यांना मिळणाऱ्या पेन्शनच्या रक्कमेमध्ये सुद्धा आहे.

मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.