घटस्फोटानंतर सानिया मिर्झाची भावूक पोस्ट, शोएब मलिक संदर्भात नाव न घेता…

Sania Mirza Divorce with Shoaib Malik | घटस्फोटानंतर सानिया मिर्झा आपले आयुष्य नव्याने जगण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर सानियाने नवीन आयुष्य सुरु केले आहे. आता तिने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

घटस्फोटानंतर सानिया मिर्झाची भावूक पोस्ट, शोएब मलिक संदर्भात नाव न घेता...
Sania Mirza
Follow us
| Updated on: Feb 15, 2024 | 8:38 AM

नवी दिल्ली, दि. 15 फेब्रुवारी 2024 | भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिचा पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik) याच्यासोबत असलेला संसार मोडला आहे. घटस्फोट झाल्यानंतर सानिया मिर्झा भारतात आली आहे. शोएब मलिक याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत विवाह केला. शोएबचा हा तिसरा विवाह आहे. हा सर्व प्रकार विसरून सानिया मिर्झा आपल्या नियमित उद्योगाला लागली आहे. सानियाकडून नव्याने आयुष्य जगण्यास सुरुवात केली आहे. नुकतीच ती टेनिसमधील जुना जोडीदार रोहन बोपन्ना (Rohan Bopanna) यांच्या पार्टीला हजेरी लावली होती. आता तिने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

काय लिहिले सानिया मिर्झा हिने

सानिया मिर्झा हिने जी पोस्ट शेअर केली आहे त्यात ‘ व्हॉट इज सब्र’ असा मथळा दिला आहे. यासंपूर्ण पोस्टमध्ये सानिया हिने शोएब मलिक याचे नाव घेतले नाही. परंतु तिचा रोख त्याच्याकडेच होता. शोएबला माफ केल्याचे तिने म्हटले आहे. सोनियाने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्यात लिहिले की, ‘जेव्हा तुमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असेल, परंतु बाहेरच्या जगात तुमच्या चेहऱ्यावर हास्य असेल. डोळ्यातून अश्रू येतील, परंतु ते पाहण्यापूर्वी ते पुसून घेतले असणार. ज्याने तुमच्यासोबत चुकीचा व्यवहार केला, त्याला माफ करणेही ‘सब्र’ आहे. अल्लाहवर विश्वास ठेवावा, जे होईल ते सर्व ठीक होईल. अल्लाहच्या प्लॅनवर विश्वास ठेवणेही सब्र आहे.

हे सुद्धा वाचा

सानियाचा शोएबसोबत 2010 मध्ये विवाह

2010 साली पाकिस्तानी खेळाडू शोएब मलिक याच्यासोबत भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा हिने लग्न केले होते. हे लग्न त्यावेळी अनेकांना रुचले नव्हते. कारण शोएब मलिक याचा हा दुसरा विवाह होता. 2002 मध्ये शोएब आणि आयशा यांचे लग्न झाले होते.

तसेच आयशा सिद्दीकी हिने शोएब मलिक विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली होती. एप्रिल 2010 मध्ये पहिली पत्नी आयशा सिद्दीकी हिला घटस्फोट दिला होता. त्यानंतर आता सानियासोबतही शोएबचा घटस्फोट झाला आहे. आता शोएबने तिसरा विवाह केला आहे. पाकिस्तानी कलाकर सना जावेद हिच्यासोबत तिने विवाह केला आहे.

हे ही वाचा

शोएब मलिकशी घटस्फोटानंतर सानिया मिर्झा सक्रीय, एक्स पार्टनरसोबत पार्टीत जल्लोष

...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.