Video: टीम इंडियाला झोडपणाऱ्या रुटच्या मदतीला जेव्हा विराट धावला
जो रुटला वेदना होऊ लागल्या. तो मैदानावर कोसळला. हे पाहून विराट कोहली टीम इंडियाला झोडपणाऱ्या जो रुटच्या मदतीला धावला. Joe Root Virat Kohli
चेन्नई: टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड ( India vs england) यांच्यातील सुरु असलेल्या पेटीएम कसोटी मालिकेतील पहिल्या सामना चेन्नईत (Chennai) खेळण्यात येत आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा कर्णधार जो रुट यांच्यामध्ये घडलेली एक घटना क्रिकेट हा जंटलमनचा गेम असल्याचं दाखवून देणारी ठरली. पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसातील तिसऱ्या सत्रामध्ये 87 व्या ओव्हरवेळी जो रुटला वेदना होऊ लागल्या. तो मैदानावर कोसळला. हे पाहून विराट कोहली टीम इंडियाला झोडपणाऱ्या जो रुटच्या मदतीला धावला. (England skipper Joe Root suffered a cramp Virat Kohli helped him while he waited for the visiting team’s physio )
#SpiritOfCricket at its very best ??#INDvENG @Paytm | @imVkohli pic.twitter.com/vaEdH29VXo
— BCCI (@BCCI) February 5, 2021
बीसीसीआयकडून विराटचा व्हिडीओ शेअर
जो रुटला वेदना होऊ लागल्यानंतर तो जमिनीवर कोसळला होता. त्यानंतर तो इंग्लंडच्या टीमचा फिजिओ मैदानात येण्याची वाट पाहात होता. तोपर्यंत विराट कोहलीनं जो रुटच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न केला. विराट कोहलीच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होतं आहे. बीसीसीआयनं विराट कोहलीचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. यासोबत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचाही खिलाडू वृत्ती दाखवणारा फोटो शेअर केला आहे.
Class Act! ??
Respect your opposition, the @msdhoni and @imVkohli way! ? #SpiritofCricket #TeamIndia
Watch ??
— BCCI (@BCCI) February 5, 2021
इंग्लंडचा कर्णधार जो रुट (England Captain Joe Root) याचा कसोटी कारकिर्दीतील हा 100 वा सामना आहे. त्याने या सामन्यात भीमपराक्रम केला आहे. शंभराव्या सामन्यात शतकी खेळी करण्याची कामगिरी रुटने केली आहे. रुटने 164 चेंडूंमध्ये हे शतक पूर्ण केलं आहे. रुटच्या कसोटी कारकिर्दीतील हे 20 वे शतकं ठरलं.
रुट कसोटीतील 100 व्या सामन्यात शतक लगावणारा एकूण दहावा तर तिसरा इंग्लिश फलंदाज ठरला आहे. तसेच भारतात शंभराव्या सामन्यात शतक लगावणारा तो ओव्हरऑल तिसरा बॅट्समन ठरला आहे. याआधी पाकिस्तानच्या जावेद मियॉंदाद आणि इंझमाम उल हक या दोघांनी भारत विरोधात अशी कामगिरी केली होती.
रुटचा 100 वा कसोटी सामना
टीम इंडिया विरोधातील हा सामना रुटच्या कसोटी कारकिर्दीतील 100 वा सामना ठरला आहे. अशी कामगिरी करणारा तो इंग्लंडचा 15 वा खेळाडू ठरला आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुकने इंग्लंडकडून 100 किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळण्याची कामगिरी केली आहे. कुकने इंग्लंडकडून एकूण 161 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. तर अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसन 158 टेस्ट खेळला आहे. वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडनेही 144 सामन्यांमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच या व्यतिरिक्त इंग्लंडच्या अनेख खेळाडूंनी 100 पेक्षा अधिक सामने खेळण्याची कामगिरी केली आहे.
संबंधित बातम्या:
India vs england 1st test | टीम इंडिया विरुद्ध मैदानात उतरताच इंग्लंडच्या जो रुटची ऐतिहासिक कामगिरी
England skipper Joe Root suffered a cramp Virat Kohli helped him while he waited for the visiting team’s physio