ENG vs NED : धो डाला… 498 धावा! इंग्लंडच्या फलंदाजांनी नेदरलँडच्या गोलंदाजांना फोडून काढलं, वनडेतील सर्वाधिक धावांचा विक्रम
इंग्लंडने नेदरलँड विरोधात पहिल्या वनडे मॅचमध्ये इतिहास रचलाय. इंग्लंडच्या फलंदाजांनी तडाखेबाज फलंदाजी करत वनडेच्या इतिहासातील सर्वाधिक स्कोर केलाय. पहिल्यांदा फलंदाजी घेत इंग्लंडने 4 विकेटच्या मोबदल्यात 498 धावा केल्या. या धावा म्हणजे वनडेतील नवा विश्वविक्रम आहे.
नवी दिल्ली : इंग्लंडने (England) नेदरलँड विरोधात पहिल्या वनडे मॅचमध्ये इतिहास रचलाय. इंग्लंडच्या फलंदाजांनी तडाखेबाज फलंदाजी करत वनडेच्या इतिहासातील सर्वाधिक स्कोर केलाय. पहिल्यांदा फलंदाजी घेत इंग्लंडने 4 विकेटच्या मोबदल्यात 498 धावा केल्या. या धावा म्हणजे वनडेतील नवा विश्वविक्रम (World Record) आहे. इंग्लंडच्या टीमने 481 धावांचा आपलाच विश्वविक्रम मोडला आहे. इंग्लंडने जवळपास चार वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियाविरोधात (Australia) एकदिवसीय सामन्यात 6 विकेटच्या मोबदल्यात 481 धावांचा विश्वविक्रम केला होता. इंग्लंडच्या नावावर आता क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक धावा बनवण्याच्या 3 विक्रमांची नोंद झाली आहे.
England creates a world record for highest team totals in ODIs by scoring 498/4 against the Netherlands pic.twitter.com/5HG0MTYXt0
— ANI (@ANI) June 17, 2022
England do love to score ??? in ODI cricket ? #NEDvENG pic.twitter.com/78n68elF1p
— ICC (@ICC) June 17, 2022
बटलरचे 47 चेंडूत शतक
इंग्लंडच्या या विश्वविक्रमात खरा वाटा राहिला तो फिलिप सॉल्ट, डेविड मलान आणि जॉस बटलर यांचा. सुरुवातीला सॉल्ट आणि मलान यांनी शतक ठोकलं. त्यानंतर मैदानावर आलेल्या बटलरने केवळ 47 चेंडूत शतक झळकावलं. बटलरने 70 बॉलमध्ये 14 सिक्स ठोकत नाबाद 162 धावा केल्या. तर लियाम लिविंगस्टोनेही 17 चेंडूत अर्धशतक झळकावलं. एबी डिव्हिलियर्सचं 16 चेंडूतील अर्धशतकाचा विक्रम मोडण्याची त्याची संधी एका बॉलने हुकली.
Incredible.
We break our own World Record with a score of 4️⃣9️⃣8️⃣
?? #NEDvENG ??????? pic.twitter.com/oWtcfh2nsv
— England Cricket (@englandcricket) June 17, 2022
एका सामन्यात तिघांची शतकी खेळी
जेसन रॉयच्या रुपात एक रन असताना पहिला झटका इंग्लंडला बसला. त्यानंतर आलेल्या इंग्लंडच्या तीन खेळाडूंनी शतकी खेळी केली. वनडेच्या इतिहासात इंग्लंडच्या तीन खेळाडूंनी पहिल्यांदाच शतकी खेळी साकारली. सॉल्टने 93 चेंडून 122 धावा केल्या, त्यात 14 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश आहे. मलानने 109 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 125 धावांची खेळी केली. तर बटलरने 70 बॉलमध्ये 14 सिक्स ठोकत नाबाद 162 धावा केल्या.
मलानने वनडे कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं आहे. त्यामुळे तो क्रिकेटच्या तिनही प्रकारात शतक झळकावणारा इंग्लंडचा तिसरा खेळाडू ठरला आहे. सॉल्ट आणि मलान या दोघांमध्ये 222 धावांची भागिदारी झाली. तर लिविंगस्टोनने 22 चेंडून नाबाद 66 धावांची धडाकेबाजी खेळी केली. तर इंग्लंडचा कर्णधार इऑन मार्गनची बॅट मात्र चालली नाही.