ENG vs WI LIVE इंटरनॅशनल मॅचमध्ये भांडण, कॅप्टनवर रागवून बॉलरने असं केलं की, सगळेच हैराण VIDEO

ENG vs WI : इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये ब्रिजटाऊन येथे तिसरा वनडे सामना झाला. या मॅचमध्ये अशी एक घटना घडली की, मैदानावर उपस्थित असलेले खेळाडू, प्रेक्षक सगळेच हैराण झाले. इंटरनॅशनल क्रिकेट सामन्यात असं होणं ही एक गंभीर बाब आहे.

ENG vs WI LIVE इंटरनॅशनल मॅचमध्ये भांडण, कॅप्टनवर रागवून बॉलरने असं केलं की, सगळेच हैराण VIDEO
West Indies playerImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Nov 07, 2024 | 11:02 AM

इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान एक विचित्र घटना पहायला मिळाली. ब्रिजटाऊनमध्ये सामना सुरु होता. वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्जारी जोसेफने लाइव्ह सामन्यात फिल्ड सेटिंग करताना कॅप्टन शे होपशी वाद घातला. मैदान सोडून तो बाहेर निघून गेला. अल्जारी जोसेफ बाहेर गेल्यामुळे वेस्ट इंडिजच्या टीमला नाईलाजाने 10 खेळाडूंनी सामना खेळावा लागला. पहिल्या इनिंगच्या चौथ्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. अल्जारीने स्लिप हटवून पॉइंटकडे क्षेत्ररक्षक ठेवायला सांगितला. पण कॅप्टन होपने त्याचं म्हणण ऐकलं नाही. याच कारणामुळे अल्जारी जोसेफ भडकला.

वेस्ट इंडिजने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. 3 ओव्हरमध्ये 10 रन्स देऊन 1 विकेट काढला होता. चौथ्या ओव्हरमध्ये अल्जारी जोसेफच्या हातात चेंडू दिला. कॅप्टन शे होपने नव्या बॅट्समनसाठी दोन स्लिप्स लावल्या. अल्जारीने पहिला चेंडू आउट साइड बॅक ऑफ लेंथ टाकला. त्यानंतर त्याने एक स्लिप काढून फिल्डरला पॉइंटच्या दिशेने ठेवण्याची सूचना केली. पण होपने त्याचं ऐकलं नाही. दुसरा चेंडू ऑफच्या दिशेने टाकल्यानंतर अल्जारीने नाराजी व्यक्त केली. पण तरीही कॅप्टनने ऐकलं नाही. त्यावर अल्जारी जोसेफ खवळला. त्याने 148 च्या स्पीडने तिसरा चेंडू बाऊन्सर टाकून जॉर्डन कॉक्सला कॅचआऊट केलं. पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.

त्याला हे पटलं नाही

कॉक्स बाद झाल्यानंतर अल्जारी जोसेफ आणि वेस्ट इंडिजचा कॅप्टन शे होपमध्ये जोरदार वाद झाला. होपने त्यानंतर आपल्या हिशोबाने फिल्ड प्लेसमेंट केली. त्यामुळे अल्जारी नाराज झाला. त्याला हे पटलं नाही. ओव्हर पूर्ण झाल्यानंतर तो मैदान सोडून बाहेर गेला. कोणालाही असं काही घडले याचा अंदाज नव्हता. त्यामुळे पुढच्या षटकात वेस्ट इंडिजला मैदानावर 10 खेळाडूनिशी खेळाव लागलं. त्यानंतर पुढच्या ओव्हरमध्ये अल्जारी जोसेफ मैदानावर आला. अल्जारी जोसेफने 10 ओव्हरमध्ये 45 धावा देऊन 2 विकेट काढल्या.

Non Stop LIVE Update
पवारांवरील त्या वक्तव्यानंतर खोत म्हणाले, 'ही गावगाड्याची भाषा पण...'
पवारांवरील त्या वक्तव्यानंतर खोत म्हणाले, 'ही गावगाड्याची भाषा पण...'.
खाल्ल्या ताटात घाण करणारे उदय सामंत, ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
खाल्ल्या ताटात घाण करणारे उदय सामंत, ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
अजितदादांनी खोतांना झापलं, 'निषेधच नाही तर मी त्यांना फोन केला अन्...'
अजितदादांनी खोतांना झापलं, 'निषेधच नाही तर मी त्यांना फोन केला अन्...'.
खोतांचं जतच्या सभेत पवारांच्या आजारावरुन वादग्रस्त वक्तव्य, टीकेची झोड
खोतांचं जतच्या सभेत पवारांच्या आजारावरुन वादग्रस्त वक्तव्य, टीकेची झोड.
'लाडक्या बहिणीं'ना आता 1500 नाही 2100 रूपये मिळणार, राज ठाकरेंचा विरोध
'लाडक्या बहिणीं'ना आता 1500 नाही 2100 रूपये मिळणार, राज ठाकरेंचा विरोध.
राज ठाकरेंचा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांना सवाल, 'आरक्षण कस मिळेल?'
राज ठाकरेंचा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांना सवाल, 'आरक्षण कस मिळेल?'.
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?.
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य.
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा.
पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद..., गोविंदगिरींची राहुल गांधींवर टीका
पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद..., गोविंदगिरींची राहुल गांधींवर टीका.