इंग्लंडमध्ये दिग्गज खेळाडूला पोलिसांनी रात्री 3 वाजता घरातून उचललं, महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप
खेळाडूवर बलात्काराचा (Rape) आरोप करण्यात आला आहे. इंग्लिश मीडिया रिपोर्टनुसार फुटबॉलपटूला रात्री उशिरा घरातून अटक करण्यात आली आहे.

मुंबई: इंग्लिश प्रीमियर लीग (EPLमध्ये खेळणाऱ्या एका मोठ्या फुटबॉलपटूला (Football palyer) लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. खेळाडूवर बलात्काराचा (Rape) आरोप करण्यात आला आहे. इंग्लिश मीडिया रिपोर्टनुसार फुटबॉलपटूला रात्री उशिरा घरातून अटक करण्यात आली आहे. हा फुटबॉलपटू कोण आहे? त्याची माहिती अजून सार्वजनिक केलेली नाही. आंतरराष्ट्रीय फुटबॉल विश्वातील हा मोठा खेळाडू असल्याची माहिती आहे. रात्री 3 वाजता पोलिसांनी त्याला घरातून अटक केली. त्यावेळी हा खेळाडू झोपला होता.
मुलगी फाइव्ह स्टार हॉटेलमधून कशीबशी निसटली
आरोपी फुटबॉलपटूची तब्बल 15 तास कसून चौकशी करण्यात आली. सुट्टीच्या काळात त्याने एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित मुलगी फाइव्ह स्टार हॉटेलमधून निसटण्यात कशीबशी य़शस्वी ठरली. तिने तडक आपलं घर गाठलं.
पीडित मुलीने पुरावे दिले
रविवारी सकाळी पीडीत मुलगी लंडनमध्ये पोहोचली व तिने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. मुलीने पुरावेही पोलिसांसमोर सादर केले. तिने काही फोटो पोलिसांना दाखवले. त्या आधारावर पोलिसांनी कारवाई करत फुटब़ॉलपटूला अटक केली.
स्कॉटलंड यार्डकडून वृत्ताला दुजोरा
ब्रिटनची तपास यंत्रणा स्कॉटलंड यार्डने या वृत्ताला दुजोरा दिलाय. 20 ते 25 वर्षाच्या युवतीने फुटबॉलपटूवर बलात्काराचा आरोप केलाय, असं स्कॉटलंड यार्डकडून सांगण्यात आलं. तक्रारीनुसार, मुलीवर जून महिन्यात बलात्कार करण्यात आला. त्याचे पुरावेही तिने पोलिसांसमोर सादर केले.