MLC 2024 : मुंबई इंडियन्ससाठी यापेक्षा वाईट काय होईल? सुपरकिंग्सने दिला मोठा झटका
MLC 2024 : सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला धक्का दिला. धोनीचे 2 मित्र सुपर किंग्सच्या विजयाचे हिरो ठरले. मुंबई इंडियन्सच पुन्हा किताब जिंकण्याच स्वप्न भंग पावलं.
मुंबई इंडियन्सला जोरदार धक्का बसला आहे. सुपर किंग्सच्या सरस खेळामुळे मुंबई इंडियन्सच पुन्हा किताब जिंकण्याच स्वप्न धुळीस मिळालं. मुंबई इंडियन्सच स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलय. अमेरिकेत मेजर लीग क्रिकेट सुरु आहे. मुंबई इंडियन्सन न्यूयॉर्क विरुद्धचा एलिमिनेटर सामना टेक्सास सुपर किंग्सने 9 विकेटने जिंकला. मागच्यावर्षी मुंबई इंडियन्स न्यूयॉर्कने मेजर लीग टुर्नामेंटचा किताब जिंकला होता. MLC 2024 मध्ये एलिमिनेटर सामन्यात त्यांचा पराभव झाला. मुंबईची टीम आपल्या गत विजेतेपदाचा बचाव करु शकली नाही.
एलिमिनेटर मॅचमध्ये मुंबई इंडियन्स न्यूयॉर्कच्या टीमने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 8 विकेट गमावून 163 धावा केल्या. मुंबईकडून राशिद खान यशस्वी फलंदाज ठरला. त्याने 30 चेंडूत 4 सिक्स आणि 4 चौकारांच्या बळावर 55 धावा चोपल्या.
टार्गेट खूप छोटं वाटलं
टेक्सास सुपर किंग्स समोर विजयासाठी 164 रन्सच लक्ष्य होतं. डेवन कॉनवे आणि फाफ डु प्लेसीची जोडी मैदानात उतरली. त्यांनी अशा पद्धतीने फलंदाजी केली की, मुंबई इंडियन्स न्यूयॉर्क टीमच टार्गेट खूप छोटं वाटलं. कॉनवे आणि डुप्लेसीने पहिल्या विकेटसाठी 12.1 ओव्हरमध्ये 101 धावांची भागीदारी केली. त्यानंतर डुप्लेसी आऊट झाला. पण आपलं काम तो चोख बजावून गेला.
सुपर किंग्सची टीम फायनलमध्ये
फाफ डु प्लेसीने 47 चेंडूत 72 रन्स चोपल्या. 153.19 च्या स्ट्राइक रेटने खेळलेल्या या इनिंगमध्ये 3 सिक्स आणि 6 चौकार आहेत. डेवन कॉनवे 43 चेंडूत 51 धावांवर नाबाद राहिला. त्याने 1 सिक्स आणि 3 चौकार मारले. कॉनवे IPL 2024 मध्ये सुपर किंग्सचा भाग होता. डुप्लेसी IPL मध्ये अनेक वर्ष CSK कडून खेळलाय. या विजयासह टेक्सास सुपर किंग्सची टीम फायनलमध्ये पोहोचलीय.