एफसी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल कप : नाशिकने नागपूरच्य़ा टीमचा उडवला धुव्वा, दणदणीत विजय
नाशिकच्या बार्नस स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या टीमने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व गाजवलं. त्यांनी नागपूरच्या सेंट जॉन्स हायस्कूलला डोकं वर काढण्याची संधी दिली नाही. चेंडू जास्तवेळ बार्नस स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या ताब्यात होता.
पुणे : नाशिकची बार्नस स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणारी पहिली टीम ठरली आहे. या टीमने नागपूरच्या सेंट जॉन्स हायस्कूलवर दणदणीत विजय मिळवला. एक, दोन नव्हे, तब्बल 9-0 च्या फरकाने नागपूरच्या सेंट जॉन्स हायस्कूलचा धुव्वा उडवला. नाशिकच्या बार्नस स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या टीमने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व गाजवलं. त्यांनी नागपूरच्या सेंट जॉन्स हायस्कूलला डोकं वर काढण्याची संधी दिली नाही. चेंडू जास्तवेळ बार्नस स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या ताब्यात होता. बार्नस स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज टीमने एफसी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल क्लबच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला.
कोणी केले गोल?
त्यांनी वारंवार सेंट जॉन्स हायस्कूलच्या क्षेत्रात धडक दिली. हृदय शहा, रुद्र पटेल, जोनाथन मेंडेझ, केल्विन पायपर, रणवीर कुमार, रायन धवरे, आरव तांडले सह अन्य खेळाडूंनी गोल केले. नागपूरच्या सेंट जॉन्स हायस्कूलचा बचाव कमकुवत ठरला. त्यांचे अनेक कच्चे दुवे या सामन्यातून उघड झाले. 20 मुलांना निवडणार
एफसी बायर्न या जगप्रसिद्ध फुटबॉल क्लबमध्ये या 20 मुलांना फुटबॉलच विशेष ट्रेनिंग दिलं जाईल. जेणेकरुन, त्यांच्या फुटबॉल खेळण्याच्या टेक्निकमध्ये अधिक सुधारणा होईल. भारतात फुटबॉल चाहत्यांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. लहानांपासून वुद्धांपर्यंत फुटबॉलची आवड असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण त्या तुलनेत फुटबॉलची मैदानं, ट्रेनिंग सुविधा नाहीत.
बार्नस स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, नाशिक
आरव तांडले, जोनाथन मेंडेझ, ब्रायन कॉक्स, शादाब सय्यद, केल्विन पायपर, आदित्य शहा, रॉयस सिंह, गोवन सिंह, रुद्र पटेल, रायन धवरे, निबाश सिंह, कृष्ण सिंह, गंधार मयेकर, हृदय शहा, आदित्य सिंह, आदित महाडिक, हनीश सिंग, रणवीर कुमार, युवराज कदम
सेंट जॉन्स हायस्कूल, नागपूर
जोगराज बिट्टा, सुमित रणसिंग, एमडी महाविया, अब्दुल शेख, सिद्धार्थ वासनिक, ओजस सिराट, आर्यन कनोजिया, दुपांश थापा, मयंक बोडेले, शायान खान, इशांत कांबळे, तनय उमाटे, ऋषी गटलेवार, गारंग रंगारी, आशिसा जयश्री,इश्मीत बहोरिया, प्रज्वल साखरे, अभिमन्यू साखरे, नयन मर्दी, फिलिप तुडू, प्रणील घोषाल