VIDEO : महाराष्ट्रातील फुटबॉलपटूंना जर्मनीत कसं घडवणार? मॅथ्यूज यांनी सांगितला प्लान

हा सामना मध्यांतराला थांबला होता. त्यावेळी आमचे प्रतिनिधी संजय दुधाणे यांनी जर्मनीहून आलेले निरीक्षक मॅथ्यूज यांच्याशी संवाद साधला. मॅथ्यूज यांनी, यावेळी जर्मनीतील फुटबॉलबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली.

VIDEO : महाराष्ट्रातील फुटबॉलपटूंना जर्मनीत कसं घडवणार? मॅथ्यूज यांनी सांगितला प्लान
maharashtra cup
Follow us
| Updated on: Feb 28, 2023 | 9:43 AM

पुणे : बालेवाडी येथील फुटबॉल ग्राऊंडवर एफसी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल कप स्पर्धा सुरु आहे. ही टुर्नामेंट आता अंतिम टप्प्यात आहे. आजपासून क्वार्टर फायनलचे सामने सुरु झाले आहेत. क्वार्टर फायनलची पहिली मॅच नागपूरची सेंट जॉन्स हायस्कूल आणि नाशिकच्या बार्नस स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये सुरु आहे. हा सामना मध्यांतराला थांबला होता. त्यावेळी आमचे प्रतिनिधी संजय दुधाणे यांनी जर्मनीहून आलेले निरीक्षक मॅथ्यूज यांच्याशी संवाद साधला. मॅथ्यूज यांनी, यावेळी जर्मनीतील फुटबॉलबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली. ज्या 20 खेळाडूंना जर्मनीला पाठवण्यात येणार आहे, त्यांना काय फायदा होईल या बद्दल सांगितलं.

फुटबॉल सगळ्याच ठिकाणी सारखं, पण…..

“मी पहिल्यांदा इथे आलोय. मला पीच, ब्रँडिंग, इथलं हवामान, लोक आवडले. मी इथे जे फुटबॉल पाहतोय. त्याने मी खरोखर प्रभावित झालोय. फुटबॉल सगळ्याच ठिकाणी सारखं असतं. फक्त त्यात सुधारणेला वाव असतो” असं मॅथ्यूज यांनी सांगितलं.

जर्मनीत काय प्रशिक्षण मिळणार?

“एफबी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल कपमधून खेळाडूंना विकसित होण्यासाठी चांगली संधी आहे. इथे भरपूर मॅचेस आहेत, त्यातून खेळाडूंना शिकता येईल. आम्ही आधी इथे खेळाडूंना ३-४ दिवस ट्रेनिंग देऊ. त्यानंतर प्लेयर सिलेक्ट करु” असं मॅथ्यूज म्हणाले. “जर्मनीच्या म्युनीच शहरात फुटबॉल खूप प्रोफेशनल स्तरावर खेळलं जातं. तिथे फुटबॉलचा सर्वोच्च स्तर आहे. महाराष्ट्रातून निवडल्या जाणाऱ्या 20 मुलांना जर्मनीत फुटबॉल मॅच खेळण्याची संधी मिळेल” असं मॅथ्यूज यांनी सांगितलं. टेक्निक तुम्ही घरी शिकू शकता

“जर्मनी फुटबॉ़ल फास्ट आहे. तिथली मुलं युरोपियन देशांमधील फुटबॉल पाहतात. जर्मनीतून शिकून भारतात आल्यानंतर या मुलांना मेहनत करावी लागेल. टेक्निक तुम्ही घरी शिकू शकता. तुम्हाला कोचची गरज नाही. टेक्निकसाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल” असं मॅथ्यूज म्हणाला. एफसी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल कप या महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमाच त्यांनी कौतुक केलं. खेळाडूंना सपोर्ट करणं गरजेच आहे, ते महाराष्ट्र सरकार करतय असं मॅथ्यूज म्हणाले.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.