FC Bayern Maharashtra Cup : हाय-क्लास फुटबॉल, पुण्यावर मात करुन नवी मुंबईची टीम फायनलमध्ये
FC Bayern Maharashtra Cup : एफसी बायर्न महाराष्ट्र कप फुटबॉल टुर्नामेंटमध्ये आज एक सर्वोत्तम दर्जाच फुटबॉल सामना पहायला मिळाला. मुंबई आणि पुण्याच्या अंडर 14 वयोगटातील मुलांनी कमालीचा खेळ दाखवला.
FC Bayern Maharashtra Cup : एफसी बायर्न महाराष्ट्र कप फुटबॉल स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. पुणे बालेवाडी येथील फुटबॉल ग्राऊंडवर ही स्पर्धा सुरु आहे. आज या स्पर्धेतील उपांत्यफेरीचे सामने होत आहेत. फ्रान्सिस अग्नेल मल्टिपरपोज स्कूल, नवी मुंबई आणि नेताजी सुभाषचंद्र बोस बॉइज मिलिटरी स्कूल, पुणे या दोन टीममध्ये उपांत्यफेरीचा सामना झाला. दोन्ही टीम्समध्ये सर्वोच्च दर्जाच फुटबॉल पहायला मिळालं.
क्वार्टर फायनलमध्ये या टीम्सवर मिळवला विजय
नेताजी सुभाषचंद्र बोस बॉइज मिलिटरी स्कूलने उपांत्यपूर्व फेरीत औरंगाबाद स्टेप्पिंग स्टोन हायस्कूलचा 11-0 गोलने धुव्वा उडवला. नवी मुंबईच्या फ्रान्सिस अग्नेल मल्टिपरपोज स्कूलने अटीतटीच्या सामन्यात नाशिकच्या बार्नस स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजवर विजय मिळवला. शेवटच्या मिनिटाला गोल करुन 3-2 ने सामना जिंकला होता.
फायनलध्ये कोण पोहोचलं?
नवी मुंबईचा फ्रान्सिस अग्नेल मल्टिपरपोज स्कूल हा संघ एफसी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल कपच्या अंतिम फेरीत दाखल होणारा पहिला संघ ठरला. त्यांनी सेमीफायनलमध्ये पुण्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस बॉइज मिलिटरी स्कूलवर 2-1 ने विजय मिळवला. अखेरच्या काही मिनिटांमध्ये गोल बरोबरी साधण्यासाठी पुण्याच्या टीमने जोरदार प्रयत्न केले. पण मुंबईच्या बचावपटूंनी हे सर्व प्रयत्न हाणून पाडले.
मुंबई-पुण्याच्या मुलांचा हाय-क्लास परफॉर्मन्स
आज नेताजी सुभाषचंद्र बोस बॉइज मिलिटरी स्कूल विरुद्ध फ्रान्सिस अग्नेल मल्टिपरपोज स्कूलमध्ये रंगतदार सामना झाला. दोन्ही टीम्समध्ये तोडीसतोड खेळ पहायला मिळाला. ही स्पर्धा अंडर 14 वयोगटासाठी आजोजित करण्यात आली आहे. उपांत्यफेरीत टुर्नामेंटमध्ये एक वेगळी उंची गाठलीय. शालेय स्तरावरील मुलांचा खेळ पाहून अचंभित व्हायला होतं, इतक्या उच्च दर्जाचा परफॉर्मन्स ही मुल करतायत. ड्रिबलिंग, पासिंगच कौशल्य पाहून थक्क व्हायला होतं. या मुलांच्या परफॉर्मन्सने एफसी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल कप स्पर्धेची उंची आणखी वाढवली आहे. फ्रान्सिस अग्नेल मल्टिपरपोज स्कूल, नवी मुंबई
अर्सालान शेख, कविश साली, तनिष्क सिंग, विहान शर्मा, नेथान वाझ, रायन परेरा, संगमेश चारे, पृथ्वीराज राणावत, मोहम्मद झियान शेख, रुद्रा दावखार, झैन मोडक, कार्तिक मंधारे, सर्वेश यादव, लक्ष मालकर, आरुष राव, अधवेत सांळुखे, रियो पेन, अनवी काळे, आदित्य गुप्ता, आर्यन पिंगळे
नेताजी सुभाषचंद्र बोस बॉइज मिलिटरी स्कूल, पुणे
जॉय मोमिन, कायम पोहलिम, लीपा वालीम, वापा वालीम, आदित्य निकम, तेन्झिन लेकी, आर्यन चव्हाण, ग्रिशो खांगरीयू, अलोंग वालीम, पौतरंग हेंगलेउ, आदित्य संगमा, सोदेमसो ब्रू,तशी वायसेल, नांगमन सालनंग, हायगुइलुंग हायकुइलाक, तेन्झिन गेफेल, केइलेउलुंगबे हायकुबे, जाखी मनु, आदित्य माने, अभिजीत हरगुडे