Maharashtra Football Cup : ‘मला उद्याचा मेस्सी…’, आशिष शेलार यांच्या हस्ते मुंबई उपनगरमध्ये उद्घाटन
मुंबई शहरमधून सेंट पॉल शाळेने विजेतेपद मिळवलं. आता मुंबई उपनगरमध्ये स्पर्धेचा दुसऱा टप्पा होणार आहे. वांद्रे येथे हे सामने होणार आहेत. महाराष्ट्र शासन, जिल्हा क्रीडा परिषद मुंबई शहर यांच्यावतीने हा उपक्रम सुरु झालाय.
मुंबई : एफसी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल कप स्पर्धेचा दुसरा टप्पा आजपासून मुंबईत सुरु झाला आहे. मुंबई शहरमधून सेंट पॉल शाळेने विजेतेपद मिळवलं. आता मुंबई उपनगरमध्ये स्पर्धेचा दुसऱा टप्पा होणार आहे. वांद्रे विंग्ज स्पोर्टस सेंटर येथे हे सामने होणार आहेत. महाराष्ट्र शासन, जिल्हा क्रीडा परिषद मुंबई उपनगर आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई शहर यांच्यावतीने हा उपक्रम सुरु झालाय. आज वांद्रे पश्चिमचे आमदार आशिष शेलार यांच्याहस्ते या स्पर्धेच उद्घाटन झालं.
खेलो इंडिया, फिट इंडिया स्पर्धा
“खेळाला संस्कृतीमध्ये महत्त्व आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यापासून त्यांनी खेलो इंडिया, फिट इंडिया या स्पर्धा सुरु केल्या. मी स्वत: मिशन ऑलिम्पिक कमिटीच काम पाहतोय. आजच आमची बैठक आहे. चांगले खेळाडू हेरुन त्यांना योग्य सुविधा कशा मिळतील. ऑलिम्पिकमध्ये मेडल्स कसे वाढतील तो आमचा प्रयत्न राहणार आहे” असं आशिष शेलार यांनी सांगितलं.
मला उद्याचा मेस्सी दिसतोय
“महाराष्ट्र शासनने काही चांगल्या संस्थांशी करार केलाय. एफसी बायर्न हा जमर्नतील सुप्रसिद्ध क्लब आहे. या करारातंर्गत फक्त टेक्नोलॉजी अपग्रेडेशनच नाही, खेळाडूंना प्रत्यक्ष तिथे जाऊन खेळण्याचा अनुभव मिळणार आहे. त्याचा फायदा होईल. मला उद्याचा मेस्सी दिसतोय. तुमच्यामागे सरकार उभं आहे. गुणांना हेरुन संधी द्या” असं आशिष शेलार म्हणाले. आशिष शेलार वांद्रे पश्चिमचे आमदार आहेत. त्यांच्याहस्ते आज उद्घघाटन झालं. महाराष्ट्राच्या मातीतून उत्तम फुटबॉलपटू घडवणं हा या स्पर्धेमागचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक जिल्ह्यातून एक विजेता संघ निवडला जाणार आहे. विजेत्या टीमची दुसऱ्या जिल्ह्याच्या टीम बरोबर मॅच होईल. हा या स्पर्धेचा दुसरा टप्पा असणार आहे.