हैदाराबाद वन डे सामन्यात 5 हटके रेकॉर्ड

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये काल (2 मार्च) हैदराबादमध्ये वन डे सामना झाला. पहिल्याच वन डे सामन्यात भारताने 6 विकेट्सने ऑस्ट्रेलियावर मात केली. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना पार पडला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 236 धावांचं आव्हान भारतासमोर उभं केलं होतं. मात्र, भारतीय फलंदाजांनी हे आव्हान पूर्ण करत, सामन्यावर विजय मिळवला. या […]

हैदाराबाद वन डे सामन्यात 5 हटके रेकॉर्ड
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये काल (2 मार्च) हैदराबादमध्ये वन डे सामना झाला. पहिल्याच वन डे सामन्यात भारताने 6 विकेट्सने ऑस्ट्रेलियावर मात केली. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना पार पडला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 236 धावांचं आव्हान भारतासमोर उभं केलं होतं. मात्र, भारतीय फलंदाजांनी हे आव्हान पूर्ण करत, सामन्यावर विजय मिळवला. या सामन्यात 5 हटके रेकॉर्डही नोंदवले गेले.

रेकॉर्ड क्र. 1

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंच कारकीर्दीतील 100 वा वन डे सामना हैदराबादमध्ये खेळला. मात्र, एकही धाव न करता फिंच बाद झाला. फिंच हा तिसरा असा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला, जो आपल्या 100 व्या सामन्यात शून्य धावांवर बाद झाला. याआधी डीन जोन्स आणि क्रॅग मॅकडर्मोट या ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या नावे हा काहीसा वेगळा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे.

रेकॉर्ड क्र. 2

विराट कोहलीचा कर्णधार म्हणून 64 वा वन डे सामना होता. हैदराबाद वन डे सामना जिंकून विराटने कर्णधार म्हणून 64 पैकी 48 सामन्यांचे विजय आपल्या नावावर केले. या यादीत विराटच्या पुढे रिकी पाँटिंग (51 सामने) आणि क्लाईव्ह लॉयड (50 सामने) आहेत.

रेकॉर्ड क्र. 3

शिखर धवन पहिल्याच चेंडूवर बाद झाला. धवन आतापर्यंत दुसऱ्यांदा वन डे सामन्यात पहिल्या चेंडूवर बाद झाला आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातच धवन पहिल्या चेंडूत बाद झाला होता आणि तेही याच वर्षी.

रेकॉर्ड क्र. 4

महेंद्रसिंग धोनीने हैदराबाद वन डे सामन्यात ज्यावेळी 5 धावा केल्या, त्यावेळी त्याने कारकीर्दीतील 13 हजार धावा पूर्ण केल्या. धोनी 13 हजार धावांच्या टप्प्यापासून केवळ 5 धावा दूर होता. तर दुसरीकडे, वन डे सामन्यात धोनीच्या नावावर 10 हजार 474 धावा आहेत. या सामन्यात धोनीने 59 धावांची खेळी केली.

रेकॉर्ड क्र. 5

जसप्रीत बुमराहने हैदराबद वन डे सामन्यात दोन विकेट्स घेत 60 धावा दिल्या. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीतल्या अंतिम सामन्यानंतर दुसऱ्यांदा बुमराहने इतक्या जास्त धावा देत कमी विकेट्स घेतल्या.

संबंधित बातमी : केदार जाधवची धोनीसोबत मॅच विनिंग खेळी, ऑस्ट्रेलियावर सहा विकेट्सने मात

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.