Vinod Kambli : विनोद कांबळीच्या मदतीसाठी पुढे आला ‘हा’ माणूस, आयुष्यभर उचलणार उपचाराचा खर्च
Vinod Kambli : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची स्थितीपाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली. आपल्या फलंदाजीने कांबळीने एकेकाळी मैदान गाजवलं. पण त्याच कांबळीची आज वाईट अवस्था आहे. आता विनोद कांबळीच्या मदतासाठी एक व्यक्ती पुढे आलाय. तो कोण आहे? आयुष्यभर तो कांबळीच्या उपचाराचा खर्च उचलणार आहे.
टीम इंडियाचा माजी क्रिकेटर विनोद कांबळी सध्या ठाण्याच्या आकृती रुग्णालयात उपचार घेत आहे. विनोद कांबळीची मागच्या काही काळापासून आरोग्याच्या समस्यांशी झुंज सुरु आहे. हार्टच्या त्रासासह तो वेगवेगळ्या त्रासांना सामोरा जातोय. कांबळीने नुकतच सांगितलं की, तो गंभीर यूरिन इंफेक्शनने त्रस्त आहे. या दरम्यान त्याच्या एका नव्या आजाराचा खुलासा झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात आवश्यक चाचण्या केल्यानंतर त्याला हा आजार समोर आलाय. त्यात एक अज्ञात व्यक्ती कांबळीच्या मदतीसाठी पुढे आला आहे.
आकृती रुग्णालयाचे डॉ. विवेक त्रिवेदी यांनी विनोद कांबळीबद्दल एक मोठ वक्तव्य केलं आहे. डॉ. विवेक त्रिवेदी यांनी सांगितलं की, कांबळीच्या प्रकृतीवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. टीम मंगळवारी आणखी काही त्याच्या तपासण्या करेल. त्यांनी सांगितलं की, आकृती रुग्णालयाचे प्रभारी एस सिंह यांनी आपल्या रुग्णालयात आयुष्यभर कांबळीवर मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे कांबळीला आता उपचारासाठी पैशांच्या समस्यांचा सामना करावा लागणार नाही. मोफत उपचार त्याला आयुष्यभर मिळतील.
आधी कोण मदत करणार होतं?
याआधी विनोद कांबळीची स्थिती पाहून टीम इंडियाचे दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांनी 1983 च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळून कांबळीची मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 52 वर्षाच्या कांबळीने कपिल देव यांची ऑफर स्वीकारली व मदतीसाठी आभार मानले.
कांबळीला रुग्णालयात घेऊन येणारा चाहता कोण?
डॉ. विवेक त्रिवेदी यांनी सांगितलं की, विनोद कांबळीला सुरुवातीला यूरिन इंफेक्शन झालं. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केलं. टेस्टनंतर कांबळीच्या डोक्यात रक्ताच्या गुठळ्या झाल्याच समोर आलं आहे. आकृती रुग्णालयात अनेक चाचण्यानंतर मेंदूत गुठळ्या झाल्याच निदान केलं. कांबळीला त्याचा एक चाहता उपचारासाठी रुग्णालयात घेऊन आला. हा चाहताच रुग्णालयाचा मालक आहे.