Audio : कोहली-रवीला माहितीच नाही, आपण लाईव्ह आहोत; विराट म्हणाला, ‘शुरु से ही लगा देंगे’, शास्त्री म्हणाले, ‘हम्म चलेगा!’

विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्यात खेळाविषयीच्या काहीतरी गुजगोष्टी सुरु होत्या. मात्र त्यांच्या लक्षातच आलं नाही की आपण लाईव्ह आहोत. या संवादात विराट टीम इंडियाच्या बोलिंग अॅटॅकवर बोलतोय. (Virat kohli-Ravi Shastri Audio Clip leacked)

Audio : कोहली-रवीला माहितीच नाही, आपण लाईव्ह आहोत; विराट म्हणाला, 'शुरु से ही लगा देंगे', शास्त्री म्हणाले, 'हम्म चलेगा!'
Ravi Shastri_Virat Kohli
Follow us
| Updated on: Jun 03, 2021 | 7:30 AM

मुंबई : भारतीय क्रिकेट टीम (Indian Cricket Team) तीन महिन्यांच्या इंग्लंड दौऱ्यावर (England Tour) रवाना झाली आहे. त्यापूर्वी टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी मीडियाशी बातचीत केली. यावेळी आपण लाईव्ह आहोत, हे विराट-रवी शास्त्रींना लक्षात आलं नाही. त्यांच्या दोघांच्यात आपसात काहीतरी चर्चा सुरु होती. हा चर्चेची ऑडिओ क्लिप इंटरनेवर जोरात व्हायरल होतीय. या क्लिपमध्ये विराट म्हणतो, ‘शुरु से हे लगा देंगे’ त्यावर शास्त्री म्हणतात, ‘हम्म चलेगा!’, असा एकंदर संवाद आहे. नक्की काय आहे प्रकरण पाहूया…..!  (ICC World Test Championship Final 2021 Virat kohli Ravi Shastri press Conferece leaked Audio Clip)

नक्की प्रकरण काय?

इंग्लंडमध्ये टीम इंडिया आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची (ICC World Test Championship Final) अर्थात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल खेळणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन संघात 18 जूनपासून कसोटीची फायनल खेळवण्यात येणार आहे. तसंच हा अंतिम साना पार पडल्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका देखील भारताला खेळायची आहे. त्यासाठी 2 जून रोजी टीम इंडिया इंग्लंडला रवाना झाली. तत्पूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विराट आणि रवी शास्त्री यांच्यातल्या संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

संवादामध्ये विराट-रवी शास्त्री काय म्हणतायत?

विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्यात खेळाविषयीच्या काहीतरी गुजगोष्टी सुरु होत्या. मात्र त्यांच्या लक्षातच आलं नाही की आपण लाईव्ह आहोत. या संवादात विराट टीम इंडियाच्या बोलिंग अॅटॅकवर बोलतोय. ‘हम इनको राऊंड द विकेट डालेंगे, लाला सिराज इनको शुरु से ही लगा देंगे’, त्यावर विराटच्या मताला सहमती दर्शवत, ‘हम्म, बराबर…’ असं रवी शास्त्री म्हणतात…

फायनलमध्ये खेळणं ही तर आमची भूक

इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मीडियाशी बातचीत केली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलला पोहोचणे हे 4 ते 6 वर्षांच्या मेहनतीचं फळ आहे, असं कर्णधार विराट कोहली म्हणाला. तर कसोटी फायनल ही एक ऐवजी तीन सामन्यांची हवी होती, असं रवी शास्त्री म्हणाले.

विराट म्हणाला, “WTC फायनलचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. कसोटी खेळणं हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. आम्ही गेल्या 5-6 वर्षात ज्याप्रकारे संघबांधणी केली आहे, त्याचच फळ म्हणजे आम्ही फायनलमध्ये दाखल झालो आहे. फायनलमध्ये खेळण्याची भूक आणि इच्छा होती.”

(ICC World Test Championship Final World Test Championship Final 2021 Virat kohli Ravi Shastri press Conferece leaked Audio Clip)

हे ही वाचा :

WTC Final : इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी विराट म्हणाला, फायनल खेळणं ही तर आमची भूक!

World Test Championship: न्यूझीलंडविरुद्ध द्रविडची बॅट आग ओकायची, राहुलचे शिष्य किवींना आस्मान दाखवणार?

WTC Final : विराट, पुजारा, रहाणे, पंत नाही तर किवींविरुद्धच्या मागील सिरीजमध्ये या बॅट्समनच्या बॅटमधून सर्वाधिक रन्स!

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.