AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होणार Impact Player Rule, काय आहे नेमकं जाणून घ्या

आयपीएल स्पर्धेचं 16 वं पर्व सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. मात्र या स्पर्धेतील नव्या नियमांमुळे उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. इम्पॅक्ट प्लेयर नेमकी काय भूमिका बजावणार जाणून घ्या

IPL 2023 स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होणार Impact Player Rule, काय आहे नेमकं जाणून घ्या
आयपीएल 2023 स्पर्धेत नवा नियम लागू होणार, Impact Player म्हणजे काय? जाणून घ्या
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 4:37 PM

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 2023 चं 16 वं पर्व 31 मार्चपासून सुरु होणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींचं चांगलंच मनोरंजन होणार आहे. यंदाच्या स्पर्धेत काही नियम लागू करण्यात आले आहेत. यात इम्पॅक्ट प्लेयर नियम असणार आहे. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच असा नियम लागू होणार आहे. यात इम्पॅक्ट प्लेयरला गोलंदाजी आणि फलंदाजी करता येणार आहे. फुटबॉल आणि बास्केटबॉलसारख्या खेळात हा नियम आहे. सामन्याच्या स्थितीनुसार सब्सिस्ट्युट खेळाडूला खेळवता येणार आहे. या नियमाची घोषणा 23 डिसेंबर 2022 रोजी करण्यात आली होती.

आयपीएल इम्पॅक्ट प्लेयर म्हणजे काय?

आयपीएलमध्ये एकूण दहा संघ असणार आहेत. संघ मैदानात 11 खेळाडू घेऊन उतरेल. त्याचबरोबर 4 सब्स्टिट्युट खेळाडूंची नावं नाणेफेकीवेळी सांगावी लागतील. इम्पॅक्ट प्लेयर या चार जणांमधून एक इम्पॅक्ट प्लेयर निवडावा लागणार आहे.

इम्पॅक्ट प्लेयर फक्त भारतीय असणार का?

इम्पॅक्ट प्लेयर भारतीय असेल की विदेशी हे प्लेईंग 11 वर अवलंबून असेल. उदाहरण द्यायचं झालं तर चेन्नई आणि गुजरात संघाची सामना असेल. चेन्नईने प्लेईंग 11 मध्ये चार विदेशी खेळाडू घेतले, तर त्यांना इम्पॅक्ट प्लेयर म्हणून भारतीय खेळाडू घ्यावा लागेल. दुसरीकडे, गुजरातने प्लेईंग 11 मध्ये तीन विदेशी खेळाडू घेतले, तर त्यांना इम्पॅक्ट प्लेयर म्हणून विदेशी खेळाडूला वापरता येईल. असं असलं तरी नाणेफेकीच्या वेळी सुचवलेली चार खेळाडूंपैकीच एकाची इम्पॅक्ट प्लेयर म्हणून निवड करता येईल.

इम्पॅक्ट प्लेयर मैदानात कधी उतरेल ?

संघ इम्पॅक्ट प्लेयरचा वापर सामन्याच्या सुरुवातीपासून करू शकतो. संघाला वाटल्यास शेवटच्या काही ओव्हरसाठी त्याचा वापर करू शकते. विकेट पडल्यानंतर किंवा बॅटर रिटारर्ड हर्ट झाला की खेळाडू मैदानात उतरू शकतो.

पण विकेट पडल्यानंतर किंवा फलंदाज रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर गोलंदाजी असणाऱ्या संघाने इम्पॅक्ट प्लेयर आणाला तर तो आधीचं षटक पूर्ण करू शकणार नाही. त्याला पुढच्या षटकापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.

इम्पॅक्ट प्लेअरनंतर प्लेईंग 11 मधील ‘तो’ खेळाडू कोणती भूमिका बजावू शकतो का?

नाही. प्लेईंग इलेव्हनमध्ये एखाद्या खेळाडूची जागा इम्पॅक्ट प्लेयरने घेतली तर मूळ खेळाडू मैदानात उतरू शकत नाही. म्हणजेच बॅटिंग, बॉलिंग सोडा फिल्डिंगही करू शकत नाही.

11 खेळाडू की 12 खेळाडू फलंदाजी करणार? इम्पॅक्ट प्लेयर बॅटिंगला कधी येणार?

इम्पॅक्ट प्लेयर बॅटिंगला एखादा खेळाडू आऊट झाला किंवा रिटायर्ड हर्ट झाला तरच येऊ शकतो. कोणत्याही परिस्थितीत फक्त 11 जणांना खेळण्याची परवानगी असणार आहे.

इम्पॅक्ट प्लेयर चार ओव्हर टाकू शकतो का?

इम्पॅक्ट प्लेयर आपली चारही षटकं पूर्ण टाकू शकतो. पण कोणत्याही षटकाची मध्यात सुरुवात करू शकत नाही. म्हणजेच एखादा गोलंदाज तीन चेंडू टाकून जखमी होत बाहेर गेला तर ते षटक मैदानातील खेळाडू पूर्ण करेल. इम्पॅक्ट प्लेयरला ते षटक संपल्यानंतर गोलंदाजी करण्याची मुभा असेल.

पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....