या वेगाने तर ‘हा’ पाकिस्तानी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडेल, विराटपासून फक्त 9 पावलं दूर
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका पाकिस्तानी क्रिकेटरची चर्चा आहे. अगदी कमी सामन्यात त्याने अशी छाप उमटवलीय की, भविष्यात तो सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली या दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंचा विक्रम मोडेल अशी चर्चा आहे. पाकिस्तानातील हा नवीन स्टार क्रिकेटर कोण आहे?.
असे अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी त्यांच्या संपूर्ण वनडे करिअरमध्ये एकदाही प्लेयर ऑफ द सीरीजचा अवॉर्ड मिळालेला नाही. पाकिस्तानचा एका युवा क्रिकेटर आहे, ज्याने 9 मॅचच्या छोट्या करिअरमध्ये दोनवेळा प्लेयर ऑफ द सीरीजचा अवॉर्ड मिळवलाय. त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सीरीजमध्ये दमदार प्रदर्शनासाठी प्लेयर ऑफ द सीरीजचा पुरस्कार मिळाला. त्याचं नाव आहे, साइम अयूब. याआधी साइम अयूब झिम्बाब्वे विरुद्ध मालिकेत प्लेयर ऑफ द सीरीज बनला होता. म्हणजे वनडे करिअरच्या तीन सीरीजमध्ये तो दोनवेळा प्लेयर ऑफ द सीरीज बनलाय. जर, साइम अयूबची अशीच कामगिरी सुरु राहिली, तर तो लवकरच सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड तोडू शकतो.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा प्लेयर ऑफ द सीरीज बनण्याचा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिन 108 वनडे सीरीजमध्ये 15 वेळा प्लेयर ऑफ द सीरीज बनलाय. या यादीत दुसरं नाव विराट कोहलीच आहे. आतापर्यंत 72 वनडे सीरीजमध्ये विराट 11 वेळा प्लेयर ऑफ द सीरीज बनलाय. 3 वनडे सीरीजमध्ये दोनवेळा प्लेयर ऑफ द सीरीजचा रेशियो साइम अयूबने पुढेही कायम ठेवला, तर तो सचिन-विराटपेक्षाही पुढे निघून जाऊ शकतो.
साइम अयूबला विराट कोहलीच्या पुढे जाण्यासाठी 10 वेळा प्लेयर ऑफ द सीरीज अवॉर्ड अजून जिंकावा लागेल, तेच सचिनचा विक्रम मोडण्यासाठी त्याला अजून 14 वेळा प्लेयर ऑफ द सीरीजचा पुरस्कार मिळवावा लागेल.
त्याची कामगिरी कशी आहे?
साइम अयूबने आतापर्यंत दोनवेळा हा पुरस्कार मिळवला, त्याने त्यासाठी कशी कामगिरी केलीय त्यावर एक नजर टाकूया. साइम अयूबने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सीरीजमध्ये 3 सामन्यात 2 सेंच्युरीसह 235 धावा फटकावल्या. त्याच्या फलंदाजीची सरासरी होती 78.30. बॅट तळपल्यानंतर त्याने 2 विकेटही घेतले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्लेयर ऑफ द सीरीज बनण्याच श्रेय त्याने संपूर्ण टीमला दिलं.
दक्षिण आफ्रिकेच्या आधी झिम्बाब्वे विरुद्धही तो प्लेयर ऑफ द सीरीजचा मानकरी ठरला. त्याने 77.50 च्या सरासरीने 155 धावा केल्या. यात 113 हा त्याचा बेस्ट स्कोर होता. त्याशिवाय गोलंदाजीत त्याने 3 विकेट घेतले.