न्यूझीलंडच्या 34 वर्षाच्या गोलंदाजाचा कहर, प्रतिस्पर्धी संघाची सपशेल शरणागती
धोनी, डिविलियर्स, विराट असे काही खेळाडू मात्र अपवाद आहेत. न्यूझीलंडमध्ये स्थानिक क्रिकेट स्पर्धेतील एका सामन्यात ३४ वर्षाच्या गोलंदाजाने आपल्या जबरदस्त कामगिरीने सर्वांनाच थक्क केलं आहे.
ऑकलंड: टी-20 क्रिकेटमध्ये तरुणांना प्राधान्य दिलं जातं. कारण टी-20 चे सामने खेळताना फिटनेस, जलदगतीने हालचाल खूप महत्त्वाची असते. त्यामुळे विशी-पंचविशीतल्या खेळाडूंना संघात स्थान देण्याकडे सगळ्यांचा कल असतो. वयाची तिशी ओलांडलेल्या खेळाडूंकडून टी-20 मध्ये धमाकेदार खेळाची फारशी अपेक्षा नसते. धोनी, (Ms dhoni) डिविलियर्स, विराट असे काही खेळाडू मात्र अपवाद आहेत. न्यूझीलंडमध्ये स्थानिक क्रिकेट स्पर्धेतील एका सामन्यात ३४ वर्षाच्या गोलंदाजाने आपल्या जबरदस्त कामगिरीने सर्वांनाच थक्क केलं आहे. सेठ रॅन्स असं या गोलंदाजाचं नाव आहे. टी-20 मध्ये वय झालेले खेळाडू निष्रभावी ठरतात, असा जे विचार करतात त्यांच्यासाठी सेठ रॅन्स (seth rance) उत्तम उदहारण आहे. या ३४ वर्षाच्या गोलंदाजाने प्रतिस्रर्ध्यांचा निम्मा संघ गारद केला.
सेंट्रल डिस्ट्रिक्ट्स आणि ओटागो मध्ये सामना झाला. सेंट्रल डिस्ट्रिक्ट्सच्या टीमने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात चार विकेट गमावून 180 धावा केल्या. सेंट्रल डिस्ट्रिक्टसकडून ग्रेगने सर्वाधिक 55 चेंडूत 76 धावा केल्या. त्याशिवया विकेटकिपर डेन क्लीनरने 45 आणि कर्णधार टॉम ब्रुसने 26 धावा केल्या.
16.5 षटकात ओटागोची टीम गारद ओटागोसमोर विजयासाठी 181 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. पण सेंट्रल डिस्ट्रिक्ट्सचा गोलंदाज सेठ रॅन्सच्या भेदक माऱ्यासमोर ओटागोच्या फलंदाजांनी नांगी टाकली. ओटागोची सुरुवातही चांगली झाली नाही आणि रॅन्सने एकही मोठी भागादीरी होऊ दिली नाही. परिणामी ओटागोच्या संघाला पूर्ण 20 षटकेही खेळून काढता आली नाहीत. 16.5 षटकात त्यांचा डाव कोसळला. ओटागोचा डाव 127 धावात आटोपला. सेंट्रल डिस्ट्रिक्ट्सने 54 धावांनी विजय मिळवला.
3.5 षटकात 19 धावात पाच विकेट सेठ रॅन्सच्या भेदक माऱ्यासमोर ओटागोची अत्यंत वाईट अवस्था झाली. त्याने 3.5 षटकात 19 धावांच्या मोबदल्यात पाच विकेट घेतल्या. पाच पैकी चार विकेट टॉप ऑर्डरच्या होत्या. रॅन्सने करीअरमध्ये पहिल्यांदाच पाच विकेट घेतल्या. त्याने आतापर्यंत 76 टी-20 सामन्यात 90 विकेट घेतल्या आहेत. दोन वेळा चार विकेट घेण्याची कमाल केली आहे.
संबंधित बातम्या: हिंमत असेल तर वांद्र्यातून निवडून येऊन दाखवा, परब हे खेडेकर-कदम यांचे ‘महात्मा गांधी’; रामदास कदम यांचा हल्लाबोल Ramdas Kadam| कदमांचे 5 वार; शिवसेना संपवण्याची हरामखोरी मंत्र्यांकडून सुरू, उद्धव ठाकरेंना पत्र लिहून कारवाईची मागणी Shivaji Maharaj Statue | ‘विटंबना छोटी गोष्ट! ‘छत्रपतींच्या पुतळ्यावरील वादावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याचं धक्कादायक विधान