KL Rahul: राहुल-रोहितमध्ये जसप्रीत बुमराह सुद्धा कॅप्टनशिपच्या शर्यतीत बाजी मारुन जाऊ शकतो, कसं ते समजून घ्या…
निवड समितीने आतापर्यंत कर्णधार, उपकर्णधारपदासाठी नेहमीच फलंदाजांना प्राधान्य दिले आहे. बुमराहची उपकर्णधारपदी निवड झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नवी दिल्ली: विराट कोहलीने (Virat Kohli) कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यापासून त्याच्याजागी कसोटी संघाचे नेतृत्व करण्याची संधी कोणाला मिळणार? या बद्दल बरीच चर्चा सुरु आहे. केएल राहुल, (KL Rahul) रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि जसप्रीत बुमराह यांची नाव चर्चेत आहेत. रोहित शर्मा भारताच्या टी-20 आणि वनडे संघाचा कॅप्टन आहे. केएल राहुल उद्यापासून सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु होणाऱ्या वनडे सीरीजमध्ये संघाचं कर्णधारपद भूषवणार आहे. कारण रोहित शर्मा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. सध्याच्या घडीला रोहित शर्मा आणि केएल राहुल या दोघांचीच नाव कसोटी संघाच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर दिसत आहेत.
राहुल काय म्हणाला? केएल राहुलने आज कसोटी संघाच्या कर्णधारपदाबाबत भाष्य केलं. “कसोटी संघाची कॅप्टनशिप मिळाली, तर तो माझा सन्मान असेल. जोहान्सबर्गमध्ये मला संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. हा खूप विशेष अनुभव होता. निकाल आमच्या बाजूने लागला नाही. पण मला खूप काही शिकायला मिळालं” असं राहुलने आज व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत सांगितलं.
“देशाचं नेतृत्व करायला मिळणं ही कोणासाठीही मोठी बाब आहे. मी सुद्धा अपवाद नाहीय. कसोटी संघाचं कर्णधारपद दिलं, तर ती माझ्यासाठी मोठी जबाबदारी असेल. हे खूपच उत्साहवर्धक आहे. मी याबद्दल फार विचार करत नाहीय. पण सध्या जे समोर आहे, त्यावर लक्ष केंद्रीत केलय” असं राहुल म्हणाला. काल जसप्रीत बुमराहने सुद्धा अशीच भावना व्यक्त केली होती. “मला कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवायची संधी मिळाली, तर तो माझा सन्मान असेल” दोघांनी आपली इच्छा व्यक्त केल्यामुळे कसोटी संघाच्या कर्णधारपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याची उत्सुक्ता वाढली आहे. प्रसंगी निवड समिती बुमराहबाबत वेगळा विचार करु शकते. कारण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरीजसाठी तो उपकर्णधार आहे.
बुमराहचा वेगळा विचार का होऊ शकतो? निवड समितीने आतापर्यंत कर्णधार, उपकर्णधारपदासाठी नेहमीच फलंदाजांना प्राधान्य दिले आहे. बुमराहची उपकर्णधारपदी निवड झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जसप्रीत बुमराह या पदासाठी पात्र नाही, असं अजिबात म्हणता येणार नाही. कारण बुमराहने वनडे, टेस्ट आणि टी-20 क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात स्वत:चे कर्तृत्व सिद्ध केलं आहे. ऑस्ट्रेलियाने अलीकडेच प्रमुख गोलंदाज पॅट कमिन्सची कर्णधारपदी निवड केली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध Ashes मालिकेत विजयी आघाडी सुद्धा घेतली होती. निवड समिती ऑस्ट्रेलियासारखाही विचार करु शकते. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला अॅशेस मालिकेत 4-0 अशी धूळ चारली आहे.
In rohit & Rahul selection committee could select jasprit bumrah as test Captain understan how