Tokyo Olympics : ‘या’ दोन देशाच्या खेळाडूंना कोरोनाची बाधा, टोक्योत आतापर्यंत 6 ऑलम्पिक खेळाडू संक्रमित

टोक्यो ऑलम्पिकमध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतच असून आणखी दोन देशाच्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे जपान सरकार आणि आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीची डोकेदुखी वाढली आहे.

Tokyo Olympics : 'या' दोन देशाच्या खेळाडूंना कोरोनाची बाधा, टोक्योत आतापर्यंत 6 ऑलम्पिक खेळाडू संक्रमित
टोकियो ऑलम्पिक
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 5:52 PM

टोक्यो : संपूर्ण जग वाट पाहत असलेली टोक्यो ऑलम्पिक (Tokyo Olympic) स्पर्धा 23 जुलैपासून सुरु होत आहे. पण स्पर्धेवरील कोरोनाचं सावट गडद होत असल्याने जपान सरकार आणि आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समिती चिंतेत पडले आहेत. आतापर्यंच काही देशाच्या खेळाडूंसह आणि सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये आता चिली आणि नेदरलँड या देशांचे खेळाडू देखील सामिल झाले असून त्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. चिलीचा तायक्वांदो खेळाडू फर्नांडा एग्वायर आणि नेदरलँड्सची स्केटबोर्ड खेळाडू केंडी जेकब्स यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते दोघेही स्पर्धेतून बाहेर गेले आहेत.

फर्नांडा विमानतळावर पोहचला असता तेथे केलेल्या चाचणीत त्याचा कोरोना अहवाल पॉजिटिव्ह आला. चिलीची राष्ट्रीय ऑलम्पिक समिति (एनओसी) दिलेल्या माहितीत जपान पोहोचल्यानंतर करण्यात आलेल्या चाचणीत फर्नांडा एग्वायरला कोविड-19 ची लागण झाल्याचे सांगण्यात आले आहे. तर नेंदरलँडच्या केंडीला टोक्योमध्ये सरावादरम्यान कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. टोक्योमध्ये ऑलम्पिकसाठी आलेल्या खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याची ही सहावी घटना आहे.

केंडीने इन्स्टाग्राम वर केला खुलासा

केंडीने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर एक पोस्ट करत कोरोना झाल्याची माहिती दिली. तिने लिहंल, ‘माझं मन खूप निराश झालं आहे. दुर्दैवाने आज सकाळी माझा कोरोना अहवाल पॉजिटिव्ह आला. ज्यामुळे यंदाची माझी ऑलम्पिक यात्रा इथेच संपत आहे.’

View this post on Instagram

A post shared by Candy Jacobs (@candy_jacobs)

ऑलम्पिक समिती सज्ज!

सुरक्षेचा उपाय म्हणून टोक्यो ऑलम्पिक खेळांचे आयोजन विनाप्रेक्षक मोकळ्या स्टेडियममध्ये होणार आहे. कोरोनाची लागण वाढू नये यासाछी ऑलम्पिक समितीने हे पाऊल उचलले आहे. शनिवारी आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीचे (IOA) अध्यक्ष थॉमस बाक यांनी जपानच्या नागरिकांना कोरोना संक्रमणापासून स्वत:चा बचाव करण्याची अपील केली.  याआधी टोक्यो ऑलम्पिकचे अध्यक्ष सिको हाशिमोटो म्हणाले होते, ‘आम्ही  कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सर्व शक्य प्रयत्न करत आहोत.  पण तरी कोरोनाचा विस्फोट झाला तर त्याचा सामना करण्यासाठी आपणा सर्वांना सज्ज रहावे लागेल.’

ऑलम्पिक 2032 ब्रिस्बेनमध्ये

टोक्योमधील ऑलम्पिक स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच 2032 साली ऑलम्पिक खेळवण्यात येणारा देश फायनल करण्यात आला आहे. नुकतीच आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीने याबाबतची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियातील ब्रिसबेन (Brisbane) शहराला 2032 च्या ऑलम्पिक स्पर्धा खेळवण्याचा मान देण्यात आला आहे. हा मान ब्रिस्बेनला मिळणार असल्याची चर्चा आधीपासूनच होती. पण बुधवार समितीने दिलेल्या निर्णयात यावर शिक्कामोर्तब झाले.

हे ही वाचा :

Olympic Games 2032 : ऑलम्पिक गेम्स 2032 साठी ‘या’ देशाची निवड, आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीचा निर्णय

Tokyo Olympics मध्ये ‘या’ दोघा खेळाडूंना ध्वजवाहकाचा मान, भारतीय ऑलिम्पिक संघटनेची माहिती

(In Tokyo Olympic chile and Nedarland Athlets found corona Postive)

फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.