IND vs AUS Test: केएल राहुल स्वस्तात बाद झाल्याने सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव, पाहा काय म्हणाताहेत नेटकरी
भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार केएल राहुल गेल्या काही सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करु शकलेला नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतही स्वस्तात बाद झाला. यामुळे केएल राहुल नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे.
मुंबई : बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताची नाजूक स्थिती आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने सर्वबाद 263 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघातील आघाडीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. केएल राहुल बाद झाल्यानंतर एकामागोमाग एक खेळाडू तंबूत परतले. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही केएल राहुल अपयशी ठरला. यानंतर केएल पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाल्यानंतर केएल राहुल नाथन लायनच्या गोलंदाजीवर लगेचच बाद झाला. नाथन लायननं त्याला पायचीत करत तंबूत धाडलं. केएल राहुलनं 41 चेंडू खेळत 1 चौकाराच्या मदतीने 17 धावा केल्या. बॉर्डर गावसकर कसोटी मालिका भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची आहे. ही मालिका भारताने 3-0 ने जिंकल्यास अंतिम फेरीतील स्थान निश्चित होणार आहे. सध्या भारताने पहिल्या कसोटी विजयानंतर 1-0 ने आघाडी घेतली आहे.
पहिल्या कसोटी सामन्यातही केएल राहुलने 71 चेंडूत 20 धावा केल्या होत्या. तेव्हा टोड मर्फीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला होता.सततच्या पडत्या आलेखामुळे आता त्याच्यावर टीका होऊ लागली आहे. माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद यानेही त्याच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केलं होतं. नेटकरीही मीम्सच्या माध्यमातून केएल राहुलवर टीका करत आहेत.
KL Rahul#INDvAUS pic.twitter.com/lfRpo0MLcB
— Krishna (@Atheist_Krishna) February 18, 2023
KL Rahul pic.twitter.com/u6Fq0GDchE
— Drink Cricket (@Abdullah__Neaz) February 18, 2023
Hello @BCCI what is the procedure to remove KL Rahul from Indian Team??#KLRahul pic.twitter.com/BzwvdB1fnu
— DJ (@Garvi_gujarat2) February 18, 2023
KL Rahul Scores 10 , 4 , 0 , 16 , 54 , 4 , 13 , 8 , 10 , 23 , 36 , 19 , 0 , 37 , 149 , 0 , 4 , 33 , 2 , 44 , 2 , 0 , 9 , 44 , 38 , 13 , 6 , 84 , 26 , 129 , 5 , 0 , 8 , 17 , 46 , 123 , 23 ,50 ,8 ,12 ,10 ,22,23 , 10,2,20,17
And he is our vc 17 single digit scores #bgt pic.twitter.com/ZF0WDzSSBE
— Riseup Pant (@RiseupPant) February 18, 2023
After playing 1-2 good shot kl rahul’s skills to him pic.twitter.com/4jxHRQixm0
— memes_hallabol (@memes_hallabol) February 18, 2023
KL Rahul contribution for Team India in 2nd Test be like #KLRahul#IndVsAus2023 #INDvAUS pic.twitter.com/Fl5aPCbG6E
— Ashutosh Srivastava (@sri_ashutosh08) February 18, 2023
KL Rahul in every Big Match #INDvsAUS #IndiaVsAustralia pic.twitter.com/uc1wsZDb05
— Rupen Chowdhury (@rupen_chowdhury) February 9, 2023
वाईट म्हणजे केएल राहुल उपकर्णधार आहे!
केएल राहुलला उपकर्णधारपद दिल्याने माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसादनं टीकास्त्र सोडलं होतं. “सर्वात वाईट गोष्ट म्हणजे केएल राहुलला उपकर्णधारपद दिलं आहे. खरं तर आर. अश्विनला उपकर्णधारपद देणं गरजेचं होतं. कारण त्याला क्रिकेटची चांगली समज आहे आणि डोकंही..अश्विनला शक्य नसतं तर पुजारा, जडेजाला हे पद दिलं पाहीजे होतं.”, असंही वेंकटेश प्रसादनं पुढे सांगितलं.
केएल राहुलची कसोटी क्रिकेट कारकिर्द
केएल राहुल आतापर्यंत 47 कसोटी सामने खेळला असून त्यात 80 सामन्यात फलंदाजी करण्याची संधी मिळाली. केएल राहुलने 7 शतकं आणि 13 अर्धशतकांच्या जोरावर 2641 धावा केल्या आहेत. कसोटीत 199 ही खेळी सर्वोत्तम ठरली आहे. त्याची फलंदाजी सरासरी 33.86 इतकी आहे.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जाडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, आर. अश्विन, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेविस हेड, पीटर धाव हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि मॅथ्यू कुहनेमन.