वॉश्गिंटन ‘सुंदर’च्या खेळीवर टीम इंडियाचे चाहते फिदा, मात्र ‘बापमाणूस’ नाराज….

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील चौथ्या सामन्यातील तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर या जोडीने कमाल बॅटिंग केली.

वॉश्गिंटन 'सुंदर'च्या खेळीवर टीम इंडियाचे चाहते फिदा, मात्र 'बापमाणूस' नाराज....
Follow us
| Updated on: Jan 18, 2021 | 7:06 AM

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील चौथ्या सामन्यातील (Aus vs Ind 4th Test) तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar)  आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thackur) या जोडीने कमाल बॅटिंग केली. दोघांनीही संयमी फलंदाजी करत आपल्या भात्यातील सुंदर फटके खेळले. जेव्हा टीम इंडियाची टॉप ऑर्ड ढेपाळली होती तेव्हा सुंदर आणि शार्दुलने पीचवर तळ ठोकून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना जेरीस आणलं. भारतीय क्रीडा रसिकांना सुंदर-शार्दूलची ही खेळी खूपच भावली आहे. मात्र वॉश्गिंटन सुंदरच्या या खास खेळीवर त्याचे वडील नाखूश आहेत. (Ind Vs Aus 4th test M Sundar Unhappy Over Washington Sundar batting)

“मी सुंदरच्या खेळीवर नाखूश आहे कारण तो त्याची तीच खास खेळी शतकामध्ये रुपांतरित करु शकला नाही. जेव्हा मोहम्मद सिराज बॅटिंगसाठी आला तेव्हा त्याने पळून धावा काढण्याच्या ऐवजी चौकार-षटकारांनी रन्स करायला हवे होते”, अशी खंत सुंदरच्या वडिलांनी बोलून दाखवली.

“वॉश्गिंटन पुलचे फटके तसंच मैदानाच्या चारही कोपऱ्यात मारण्यासाठी सक्षम आहे किंबहुना त्याने अशा प्रकारच्या खेळी साकारल्या आहेत.सिराज बॅटिंगला आलाल तेव्हा त्याने मोठे फटके न खेळता ऑस्ट्रेलियाच्या स्कोअरच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. परंतु मी त्याला नेहमी सांगत असतो की जेव्हा संधी मिळेल तेव्हा मोठी खेळी साकारायला हवी, असं एम. सुंदर म्हणाले.

आपला मुलगा तळाशी न राहता टॉपला येऊन बॅटिंग करु शकतो याची जाणीव एम. सुंदर यांना आहे. प्रथम श्रेणीमध्ये खेळताना वॉश्गिंटनने नेत्रदीपक फटके खेळत आपली चुणूक दाखवली आहे. त्याच्या याच खेळीच्या जोरावर त्याने आणखी मेहनत घेऊन तसंच संधी मिळेल तेव्हा मोठ्या छोट्या स्कोअरचं रुपांतर मोठ्या स्कोअरमध्ये करावं तसंच टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलावा, असं एम सुंदर म्हणाले.

वॉशिंग्टन-शार्दुलचे ‘सुंदर’ रेकॉर्ड

ब्रिस्बेनमध्ये टीम इंडियाकडून सातव्या विकेट्ससाठी सर्वोच्च भागीदारी ठरली. शार्दुल आणि वॉशिंग्टन या नवख्या जोडीने सातव्या विकेटसाठी 123 धावा जोडल्या. यासह या दोघांनी ब्रिस्बेनवरील टीम इंडियाच्या 30 वर्षांपूर्वींच्या भागीदारीचा विक्रम मोडीत काढला. याआधी टीम इंडियाकडून ब्रिस्बेनमध्ये सातव्या विकेटसाठी 30 वर्षांपूर्वी 1991 मध्ये 58 धावांची सर्वोच्च भागीदारी करण्यात आली. मनोज प्रभाकर आणि कपिल देव या जोडीने ही भागीदारी केली होती.

‘सुंदर’ कामगिरी

वॉशिंग्टनने 62 धावा केल्या. यासह सुंदर ऑस्ट्रेलियामध्ये पदार्पणातील सामन्यात 7 व्या क्रमांकावर सर्वोच्च धावा करणारा फलंदाज ठरला. सुंदरने यासह राहुल द्रविडच्या कामगिरीची पुनरावृत्ती केली. सुंदर राहुल द्रविडनंतर पदार्पणातील सामन्यात 7 व्या क्रमांकावर येत अर्धशतक लगावणारा दुसरा खेळाडू ठरला. द्रविडने 1996 मध्ये कसोटी पदार्पण केलं. द्रविडने या पदार्पणातील सामन्यात 95 धावांची खेळी केली.

(Ind Vs Aus 4th test M Sundar Unhappy Over Washington Sundar batting)

हे ही वाचा

Shardul Thakur | तुला परत मानलं रे ठाकूर, शार्दूलच्या बॅटिंगवर विराट कोहली फिदा, मराठीत कौतुक

Aus vs Ind 4th Test | शार्दूल-वॉशिंग्टनची शानदार खेळी, ब्रिस्बेनवर रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.