IND vs AUS : सचिन शेन वॉर्नच्या स्वप्नात यायचा, तसा आता हा भारतीय खेळाडू…ऑस्ट्रेलियन कोचच मोठ वक्तव्य
IND vs AUS : सचिन तेंडुलकर शेन वॉर्नच्या स्वप्नात यायचा. आता, तसाच एका भारतीय खेळाडूचा धसका ऑस्ट्रेलियन टीमने घेतला आहे. ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट टीमच्या कोचने तशी कबुली दिली आहे. त्याला दुखापत झाली नाही, तर ऑस्ट्रेलियाच टेस्ट सीरीज जिंकणं कठीण आहे, हे सुद्धा प्रामाणिकपणे कबूल केलं. म्हणजे त्या भारतीय खेळाडूला दुखापत व्हावी, अशी ऑस्ट्रेलियन कोचची इच्छा आहे.
ऑस्ट्रेलियाच ग्रेट लेगस्पिनर दिवंगत क्रिकेटपटू शेन वॉर्नने एकदा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरबद्दल मोठ वक्तव्य केलं होतं. शेन वॉर्नने क्रिकेट विश्वातील भल्या-भल्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या तालावर नाचवलं. पण त्याला सचिन तेंडुलकरच्या बाबतीत असं यश कधी मिळालं नाही. सचिन तेंडुलकरने भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात अनेकदा शेन वॉर्नची गोलंदाजी फोडून काढली. सचिनने एकदा शेन वॉर्नची गोलंदाजी इतकी धुतलेली की, सचिन आपल्या स्वप्नात येतो, अशी वॉर्नने स्वत: कबुली दिली होती. आता टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. त्यावेळी सचिन सारखाच एका भारतीय खेळाडूचा धसका ऑस्ट्रेलियन टीमने घेतला आहे. त्यांच्या बोलण्यातून या भारतीय खेळाडूची ऑस्ट्रेलियन टीमवर दहशत बसल्याच दिसून आलं.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे आतापर्यंत तीन कसोटी सामने झालेत. एकूण पाच कसोटी सामन्यांची ही सीरीज आहे. सध्या दोन्ही टीम्स 1-1 अशा बरोबरीत आहेत. अजून दोन कसोटी सामने बाकी आहेत. टीम इंडियाच्या हा ऑस्ट्रेलिया दौरा सध्या जसप्रीत बुमराह गाजवत आहे. तो शानदार फॉर्ममध्ये आहे. बुमराहची गोलंदाजी सहजतेने खेळून काढणं ऑस्ट्रेलियन टीमला जमत नाहीय. त्यांच्या मनात बुमराहच्या गोलंदाजीती भिती बसली आहे. जसप्रीत बुमराहने आता 6 डावात 21 विकेट घेतले आहेत. तो सीरीजमधील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे.
चौथी टेस्ट सुरु होण्यााधी काय म्हटलं?
जसप्रीत बुमराहची घातक गोलंदाजी पाहून ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू त्याच्या गोलंदाजीच्या प्रेमात पडले आहेत. बुमराहच्या चाहत्यांच्या यादीत दिग्गज माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आणि कोच जस्टिन लँगर सुद्धा आहे. 26 डिसेंबरला बॉक्सिंग डे ला सुरु होणाऱ्या चौथ्या टेस्ट आधी लँगर यांनी बुमराहची तुलना वसीम अक्रमशी केली. सध्याच्या घडीला बुमराह क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम गोलंदाज असल्याच म्हटलं.
त्याचा सामना करणं आवडणार नाही
जसप्रीत बुमराहने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियन फलंदाजांची झोप उडवली आहे. खासकरुन टॉप-3 फलंदाजांसाठी तो काळ बनलाय. ओपनर उस्मान ख्वाजा आणि नाथन मॅक्स्वीनी यांना आतपर्यंत सीरीजमध्ये 4-4 वेळा त्याने आऊट केलय. मार्नस लाबुशेनला बुमराहने 3 वेळा आऊट केलय. बुमराहची ही खतरनाक गोलंदाजी पाहून जस्टिन लँगरने बुमराहला उजव्या हाताचा वसीम अक्रम म्हटलय. लँगर ‘द नाइटली पॉडकास्ट’मध्ये म्हणाला की, “प्रत्येकवेळी मला मी सामना केलेल्या सर्वश्रेष्ठ गोलंदाजाबद्दल विचारलं जातं, मी तेव्हा वसीम अक्रमच नाव घेतो. माझ्यासाठी बुमराह उजव्या हाताचा वसीम अक्रम आहे. मला कधीही त्याच्या गोलंदाजीला सामोर जाणं आवडणार नाही”
‘….तर ऑस्ट्रेलियाला सीरीज जिंकणं कठीण’
लँगरने अक्रम आणि बुमराह दोन्ही गोलंदाजांची वैशिष्ट्य सांगितली. “त्यांच्याकडे चांगला पेस आहे. महान गोलंदाजांप्रमाणे एकाच ठिकाणी चेंडू टाकतात. त्यांच्याकडे चांगला बाऊन्स आहे. सोबतच दोन्ही बाजूला स्विंग करण्याची क्षमता आहे. त्याशिवाय सीम एकदम परफेक्ट असते. तुम्ही हे सर्व करण्यात पारंगत असाल, तर तुम्ही दुधारी शस्त्र आहात. म्हणून त्यांचा सामना करणं एका वाईट स्वप्नासारख असतं” असं जस्टिन लँगर म्हणाला. बुमराहला दुखापत झाली नाही, तर ऑस्ट्रेलियाला सीरीज जिंकणं कठीण होईल हे लँगरने कबूल केले.