IND vs AUS : भारताचा भरवशाचा जलदगती गोलंदाज खेळणार नागपूरची मॅच
मोहालीमध्ये सुद्धा पुन्हा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांची धुलाई झाली.
आशिया चषकात (Asia Cup 2022) खराब कामगिरी झाल्यापासून टीम इंडियाच्या (Team India) गोलंदाजांवरती जोरदार टीका सुरु आहे. कारण आशिया चषकात फलंदाजांनी (Batsman) आपली कामगिरी व्यवस्थित पार पाडल्यानंतर सुद्धा गोलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे टीम सिलेक्शनवरती (Selection Team) सुद्धा माजी खेळाडूंनी टीका केली. सद्या टीम इंडियाचा भरवशाचा बॉलर तंदुरुस्त झाला असून त्याला उद्याच्या सामन्यात संधी मिळणार आहे.
मोहालीमध्ये सुद्धा पुन्हा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांची धुलाई झाली. त्यामुळे हातातील मॅच हारली. त्यामुळे गोलंदाजांसह कॅप्टन पदावर रवी शास्त्री यांनी शंका उपस्थित केली.
पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी आशिया चषकात खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड केल्याने माजी खेळाडूंनी जोरदार टीका केली. काही गोलंदाज तंदुरुस्त असून त्यांना संधी द्यायला हवी होती असं मत व्यक्त केलं आहे.
जसप्रीत बुमराह नागपुरच्या टी20 दुसऱ्या मॅचमध्ये खेळणार आहे. बुमराहला दुखापत झाल्याने त्याला विश्रांतीचा सल्ला देण्याता आला होता. परंतु गोलंदाजांचा खराब फॉर्म पाहता उद्याचा मॅचमध्ये त्याला संधी देण्यात आली आहे.
जसप्रीत बुमराहला जुलै महिन्यात इंग्लंड विरुद्ध खेळत असताना त्रास झाला होता. त्यानंतर वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता.
संघात बुमराहला संधी दिल्यानंतर नेमकं कोणाला बसवणार ही माहिती आपल्याला मॅच सुरु होण्यापुर्वी समजेल.